अहिल्यानगर दिनांक २६ मार्च
१२ मार्च रोजी योगेश चंगेडिया यांच्या घरी पहाटे ३ वाजता दरवाजा फोडण्याचा प्रयत्न चालु असतांना घरातील लोक उठुन त्यांनी शेजारी राहणाऱ्या मित्रांना फोन केले व चोर-चोर अशी मोठ्याने आरडा ओरड झाल्यामुळे सदर चोर त्यांनी चोरलेली मारुती व्हॅन तेथेच सोडुन पोबारा केला व सदर मारुती व्हॅनमध्ये खुप मोठ-मोठी हत्यारे होती. त्या मध्ये नशिबाने मनुष्यहानी व आर्थिक हानी सतर्कतेमुळे वाचली, परंतू सदर परिसरामध्ये अशा चोरांचा खुप मोठा सुळसळाट होऊन त्यांचा तेथे वावर रात्री बेरात्री चालु आहे. पोलिस स्टेशन यांना सदर घटनेच्या वेळी फोन केला असता त्यांनी त्याची वेळीच दखल घेतली नाही सदर दखल वेळीच घेतली असती तर सदर दरोडेखोर सापडुन आले असते व त्यांचेवर मोठा वचक बसला असता याची पण आपणामार्फत योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच या भागात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन केली होती.