Homeविशेषगदर 2 चित्रपटात आग ओकणाऱ्या तोफगोळे पाहिले की नगरच्या या तरुण व्यावसायिकांची...

गदर 2 चित्रपटात आग ओकणाऱ्या तोफगोळे पाहिले की नगरच्या या तरुण व्यावसायिकांची आठवण येणारच..काय आहे या मागची गोष्ट…

advertisement

अहमदनगर दि.३ डिसेंबर
सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांच्या गदर या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलचे शुटींग नगर शहराच्या आसपास सुरू आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा या चित्रपटातील दृष्यांमध्ये बॉम्ब गोळे आग ओकतील तेव्हा नगरच्या तरुण व्यापाऱ्यांची आठवण येणारच आहे. कारण या चित्रपटात जे बॉम्ब वापरण्यात येणार आहेत त्यासाठी नगर शहरातील प्रसिद्ध फटाकडे व्यावसायिक महेश घावटे आणि रणवीर शितोळे या तरुणांनी दोन हजार ऍटोमबॉम्ब चित्रपटासाठी पुरवले आहेत.

2001 मध्ये ‘गदर-एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. भारत-पाकिस्तान तणावात फुलणारी प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली होती. सनी देओलचा आवेशी अभिनय आणि देशभक्तीचे संवाद यामुळे अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट तिकिटबारीवर तुफान गाजला होता.

पुन्हा एकदा अनिल शर्मा ‘गदर-2’च्या निर्मितीत गुंतले आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. सनी देओल, अमिषा पटेल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत आहेत. सोबत उत्कर्ष शर्मा, सीमरत कौत, लव्ह सिन्हा असे ताज्या दमाचे कलाकार चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा 22 वर्ष पुढे सरकली असून अनेक ट्विस्ट या चित्रपटात पाहायला मिळतील. नगर शहरातील फटाकड्यांचे प्रसिद्ध उद्योगपती महेश घावटे आणि रणवीर शितोळे या तरुण जोड गोळींला या चित्रपटासाठी सुमारे दोन हजार ऍटोमबॉम्ब पुरवठा करण्याची जबाबदारी असून चित्रपटात याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंग बरोबर अनेक लहान-मोठ्या व्यासायिकांना या चित्रपटाला काही ना काही वस्तू पुरवठा करण्याची संधी मिळाली आहे.

मोठ्या हिंदी चित्रपटाचे आणि मोठमोठ्या हिंदी कलाकारांचे शूटिंग प्रथमच नगर शहरात होत असल्याने अनेक नगरकर शूटिंग पाहण्यासाठी शूटिंग स्थळी गर्दी करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular