अहमदनगर दि.३ डिसेंबर
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलमगीर परीसरातून एका व्यक्तीला काही इसमांनी अपहरण करून घेऊन गेले होते ही माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी श्शिशिरकुमार देशमुख तपासाची चक्रे फिरवत भिंगार काम पोलीस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांना अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी रवाना केले होते यावेळी मिळालेल्या माहितीवरून भिंगार परिसरातील वडारवाडी या भागात एका समाज डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी सोहेल अथर हुसैन बोहरी ( वय 33 वर्षे रा. फुलारी टॉवर जवळ, आलमगीर ता.जि. अहमदनगर) या नावाचा इसम आढळून आला यावेळी त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून त्याला पैशाच्या उधारीवरून काही लोकांनी येथे डांबून ठेवले असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी अथर बोरी यास पोलीस स्टेशनला आणल्यानंतर या प्रकरणात मिळालेली माहिती अशी की उसने पैसे घेतलेल्या कारणावरून काही लोकांनी मला तसेच माझ्या घरच्यांना लाथाबुक्याने मारहाण करून मला बळजबरीने रिक्षा मधून घेऊन वडारवाडी येथील एका खोलीत डांबून ठेऊन मला मारहाण केली आहे. तसेच त्यांनी माझ्या कडे असलेला माझा कार्बन कंपनीचा मोबाईल व माझे ए टी एम माझ्या कडून बळजबरीने काढून घेतले आहे असे सांगीतले
कॅम्प पोलिसांनी अथर हुसैन बोहरी यांच्या फिर्यादीवरून अंजुम बाबासाहेब सय्यद, फैजान जहागिरदार, अश्पाक बाबसाहेब सय्यद,इरशाद बाबासाहेब सय्यद वय 39 वर्षे रा. मोमीन गल्ली, भिंगार ता. जि. अहमदनगर व एक अनोळखी इसम यांचे विरूद्ध भा द वि कलम 143,147,149,365,452,327, 342, 324, 323, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ पी ए बारगजे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशान खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ विलास गारूडकर, पोना भानूदास खेडकर, पोना राहुल द्वारके, पोकाँ अमोल आव्हाड, चापोकाँ अरूण मोरे अशांनी केली