Home शहर गुन्हेगार प्रवृत्तीचा फैजान बागवान याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी शिवसेना (शिंदे गट)...

गुन्हेगार प्रवृत्तीचा फैजान बागवान याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी शिवसेना (शिंदे गट) भजाप शिवसेना (उध्दव ठाकरे गट) आणि हिंदुत्ववादी संघटनांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अहमदनगर दि.२० सप्टेंबर-

गुन्हेगारी प्रवृत्तीचा फैजान बागवान याने शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक घटना केल्या आहेत.शहरामध्ये त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. महिलांचे छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात हा गुन्हेगार करत असतो. काल त्याने दिल्लीगेट भागात विवाहित महिलेला गाडीवर बस अन्यथा जिवे मारून टाकीत व अंगावर ऍसिड फेकेल अशी धमकी दिली आहे.सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिसाचा कुठलाही वचक नसल्यामुळे तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वारंवार घटना करीत आहे.तरी पोलीस प्रशासनाने फैजान बागवान याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena (Shinde Group),यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी खा. सदाशिव लोखंडे,जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, सुनील लालबोंद्रे, विष्णुपंत ढाकणे, अमोल हुंबे, अंकुश चितळे आदी उपस्थित होते.

उध्दव ठाकरे गटातर्फे(Shiv Sena (Uddhav Thackeray Group) देण्यात आलेल्या निवेदनावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे,माजी महापौर भगवान फुलसोंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेना सहसचिव विक्रम राठोड , विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे ,नगरसेवक दत्तामामा कावरे ,संतोष गेणप्पा ,संग्राम कोतकर ,शाम नलकांडे ,अशोक दहिफळे ,आकाश कातोरे ,विशाल गायकवाड़,अभी अष्टेकर ,पप्पू भाले ,मृणाल भिंगारदीवे ,सुमित धेंड ,कुणाल भंडारी ,गामा भागानगरे ,महेश शेळके ,केशव मोकाटे ,मयूर मैड ,प्रतिक बोगावत आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीतर्फे (BJP) निवेदन देता वेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक महेंद्र गंधे, माजी अध्यक्ष वसंत लोढा, ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष किशोर डागवाले आदी प्रमुख नेते मंडळींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी युवक उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version