Home क्राईम बनावट सोनेतारण कर्ज आकडा थांबता थांबेना रविवारी आठ तोळे तर सोमवारी 27...

बनावट सोनेतारण कर्ज आकडा थांबता थांबेना रविवारी आठ तोळे तर सोमवारी 27 तोळे बनावट सोने दोन संशयित खात्यात आले आढळून

अहमदनगर दिनांक 19 सप्टेंबर
अहमदनगर शहरातील शहर सहकारी बँकेमध्ये गोल्ड व्हॅल्यू वर अजय कापले आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या बनावट सोने(fake gold) तारण कर्ज प्रकरणातील बनावट सोने सापडण्याचा प्रकार थांबता थांबेना रोजच संशोध खात्यांमधून बनावट सोने मिळून येत आहे कोतवाली पोलीस(kotwali police) सध्या संशयित खात्यांची तपासणी करत असून रविवारी केलेल्या संशयित(suspects )खात्याच्या तपासणीत आठ तोळे बनावट सोने सापडले तर सोमवारी बाबासाहेब दुबे आणि वैभव जावक यांच्या खात्यातून 27 तोळे बनावट सोने पोलिसांना आढळुन आले याची किंमत सुमारे आठ लाख रुपयांच्या आस पास आहे.

गोल्डव्हॅल्युअर अजय कपले आणि त्याच्या साथीदारांनी विविध गरजू लोकांच्या नावावर हे सोने ठेवले आहे. आजपर्यंत पोलीस तपासणी मध्ये 36 कर्जदार आढळून आले होते. त्यांच्या तपासणीमध्ये तीन कोटी रुपयांच्या पर्यंत बनावट सोने ठेऊन कर्ज घेतल्याचं आढळून आले आहे. मात्र जवळजवळ आठ ते दहा लोक ज्यांच्या नावावर बनावट सोनेतारण कर्ज केले आहेत असे लोक पोलिसांना अद्यापही मिळून आले नाहीत. काही ठिकाणी नाव बनावट तर काही ठिकाणी पत्ते बनवट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस सध्या या कर्जदारांच्या शोधात आहेत तर अद्यापही नगर शहरातील त्या दोन पतसंस्थांनी पोलिसांना संशयित खाते तपासणीबाबत कोणतेही पत्र दिले नसल्याने सध्या तरी त्या दोन पतसंस्थेतील संशयित खाते पोलिसांनी तपासले नाहीत.

या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे  संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे, पोकों अभय कदम, पोना. बापुसाहेब गोरे, पोकॉ. गणेश ढोबळे, पोहेकॉ .दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील  पोना. सलिम शेख, पोना. बंडू भागवत, पोकॉ. सुमित गवळी, पोकॉ. अतुल काजळे हे करत आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version