Home क्राईम नांग्या तलवारी घेऊन नाचण्याचा व्हिडीओ व्हायरल नगर शहरातील घटना

नांग्या तलवारी घेऊन नाचण्याचा व्हिडीओ व्हायरल नगर शहरातील घटना

अहमदनगर दि २० मे

दिवसेंदिवस वाढदिवस, लग्न किंवा काही कार्यक्रम असेल तर नंग्या तलवारी घेऊन नाचणे किंवा तलवारीने केक कापणे ही आजकाल फॅशन सुरू झाली आहे., आशा प्रकरणाय पोलीस कारवाई होते मात्र तरीही ही फॅशन काही बंद होण्यास तयार नाही .

,असाच नांग्या तलवारी घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो नगर शहरातील आहे. इंस्टाग्राम सह फेसबुक आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच फिरत आहे.

नगर शहरातील एका लग्नाच्या वरातीत रात्रीच्या वेळेस हातात नंग्या तलवारी घेऊन तरुण नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्‍या नगर शहरातील व्हाट्सअप ग्रुप वर चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे विशेष म्हणजे घरामध्ये शुभ कार्य असेल किंवा वाढदिवस असतील तर नंग्या तलवारी घेऊन नाचण्याचा काय मनसुबा असावा हे समजला तयार नाही. मात्र या व्हिडिओने शहरात चांगलीच चर्चा रंगली असून पोलीस कारवाईला कोणी घाबरत नाही का असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version