HomeUncategorized"त्या" युवा पुढार्‍याकडून कुटुंबाला संरक्षण द्या महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव.. घरावर ताबा...

“त्या” युवा पुढार्‍याकडून कुटुंबाला संरक्षण द्या महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव.. घरावर ताबा मारण्याचा प्रकार..

advertisement

अहमदनगर दि.१९ ऑगस्ट

अहमदनगर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकाराची तक्रार एका महिलेने पोलीस अधीक्षकांकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये नगर शहरातील एका राजकीय युवा पुढाऱ्याचे नाव आल्याने या तक्रारीचे गांभीर्य वाढले आहे.

अहमदनगर शहरात मध्यवस्तीत असलेल्या लक्ष्मी कारंजा परिसरातील गुजर गल्ली येथील एका महिलेने तक्रार अर्ज दिला असून या तक्रारीत या महिलेने नगरमधील एका युवा पुढाऱ्यावर आरोप केले आहेत या महिलेची वडिलोपार्जित जागा असून ती महिला सध्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्या जागेतील काही भाग त्या युवा पुढाऱ्यांने ताब्यात घेतला होता मात्र महिलेने वेळोवेळी सांगूनही यांनी त्या जागेचा ताबा त्या महिलेस दिला नाही तसेच आता इतर राहिलेली जागाही कब्जात घेण्याचा प्रयत्न तो पुढारी करत असून दमदाटी करत असल्याची तक्रार महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यांच्यापासून आमच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे अशी मागणी तक्रार अर्जात त्या महिलेने केली असून या तक्रार अर्जावर आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. राजकीय क्षेत्रात सध्या ताबा घेण्यावरून नगर शहरात मोठे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच थेट एका युवा नेत्याच्या नावाने तक्रार अर्ज आल्यामुळे एकच चर्चेचा विषय झाला आहे.

पुढील भागात…. केडगाव मधील त्या चार प्लॉट ताबा मारण्याचा प्रयत्न केडगाव मध्ये पुन्हा दहशत सुरू

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular