Homeक्राईमअबब....हिऱ्यांच्या दागिन्यांसह सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला उपनगरा मधील मध्यवस्तीत चोरट्यांनी केली धाडसी...

अबब….हिऱ्यांच्या दागिन्यांसह सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला उपनगरा मधील मध्यवस्तीत चोरट्यांनी केली धाडसी चोरी..

advertisement

अहमदनगर दि.१८ ऑगस्ट

अहमदनगर शहरातील प्रेमदांन चौक ते इसार पेट्रोल पंप परिसरातील साई कॉलनी येथील विजय माणिकराव निकम यांच्या घरी धाडसी चोरी झाली असून या चोरीत सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहे. तर विजय निकम हे नोबेल हॉस्पिटलमध्ये सीईओ म्हणून कार्यरत आहेत.

या चोरीबाबत हकीगत अशी की विजय निकम हे आपल्या पत्नीसह पुणे येथे काही खाजगी कामानिमित्त गेले होते त्यावेळी त्यांनी पुणे येथेच मुक्काम केल्याने नगर येथील घरात कोणीही नव्हते या संधीचा फायदा घेत आज्ञात चोरट्यांनी घरातील कडी कोयंडे तोडून प्रवेश करत घरात असलेले सोन्याचे मंगळसुत्र, हातातील सोन्याच्या बांगडया, दोन छोटे मंगळसुत्र सोन्याचे, सोन्याच्या तीन अंगठया, सोन्याचे कानातील चार जोडया कर्णफुले, सोन्याची दोन चैन, एक हि-याचे मंगळसुत्र, तसेच तीन लाख रुपय रोख रक्कम तसेच सोन्याचे तीन अंगठया, दोन सोन्याचे चैन, तसेच लहान बाळाचा 6 छोटया अंगठया, रोख रक्कम एक लाख साठ हजार असा जवळपास पंधरा लाख किती पंधरा लाख 73 हजार रुपयांचा सोन्यासह रोख रकमेचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

चोरी बाबत निकम यांच्या शेजारी राहणारे प्रविण सांगलीकर यांनी आज सकाळी फोनवरून कळवले होते की तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसत आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितले की चोरीच्या घटनेच्या रात्री निकम यांच्या घरातून काहीतरी ठोकण्याचा आवाज व कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता. मात्र रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चोरट्यांनी डाव साधला.

तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शिवण पथक आणि फिंगरप्रिंट घेऊन काही संशयित लोकांची विचारपूस सुरू केली आहे. मात्र शहरातील मध्यवस्तीत ही धाडसी चोरी झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे याच भागात बिबट्या दिसल्याची बातमी काल प्रसिद्ध झाल्यानंतर या परिसरातील रस्ते रात्री दहा वाजता निर्मनुष्य झाले होते या संधीचा फायदा घेत तर चोरट्यांनी डाव साधला नाही ना अशी ही चर्चा सध्या होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular