Homeक्राईमजेसिबिने घर पडून ताबा घेण्याचा प्रयत्न..नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील घटना...गुंजाळ कुटुंबीयांना...

जेसिबिने घर पडून ताबा घेण्याचा प्रयत्न..नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील घटना…गुंजाळ कुटुंबीयांना मारहाण

advertisement

अहमदनगर दि.१९ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील रोडवरील पारिजातक चौकात पुन्हा एकदा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला आहे जेसीबी आणि गुंडांच्या मदतीने एका कुटुंबाला मारहाण करत त्यांना घरातून काढण्याचा प्रयत्न आज दुपारच्या सुमारास झाला मात्र वेळीच तोफखाना पोलिसांनी या ठिकाणी येऊन ताबा घेणाऱ्या लोकांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

याप्रकरणी आता तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून मंगल चंद्रशेखर गुंजाळ यांच्या फिर्यादी वरून गंगाराम हरुमल हिरानंदाणी रा सिव्हील हाडको अहमदनगर 2) संतोश रामकृष्ण नवगिरे, रा
कल्याणरोड, माधवनगर, अहमदनगर 3) करण खंड पाचारणे, रा-एम आय डी सी, नागापूर, अहमदनगर 4) राहुल अॅनिल झेंडे, रा-सिध्दार्थनगर,
अहमदनगर 5) आकाश रविंद्र औटी, रा-सिध्दार्थनगर, अहमदनगर 6) रणजित देवराम वैरागर, रा-लालटाकीरोड, यांच्या विरोधात भा द वी कलम 452,354,323,324,143,147,149 या कलामाखली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत थोडक्यात माहिती अशी की चंद्रशेखर विठ्ठल गुंजाळ यांची पारिजातक चौक परिसरात एक जागा असून ही जागा वडीलो पर्जित असल्याचा दावा चंद्रशेखर विठ्ठल गुंजाळ यांनी केला असून गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रशेखर विठ्ठल गुंजाळ आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी राहत आहे.

त्यांचा मुलगा प्रसाद चंद्रशेखर गुंजाळ हा चार चाकी वाहनांची डेंटींग पेंटींगचा व्यवसाय या बंगल्याच्या बाहेरच अनेक दिवसांपासून करत आहे. तर चंद्रशेखर गुंजाळ हे राहत असलेल्या बंगला प्लट नंबर 5 या एकत्रित वडीलोपार्जित मिळकतीचे वाद चालु असुन या राहत्या घराचा ताबा घेण्यासाठी मुलगा प्रसाद ऊर्फ बंटी यास धमकी येत होती. त्याअनुषंगाने गंगाराम हिरानंदानी तसेच इतर इसमांविरुद्ध गुंजाळ कुटुंबियांनी तक्रारी दिलेल्या होत्या.

19 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास गुंजाळ कुटुंबीय घरात असताना आठ ते नऊ लोकांनी अचानकपणे येऊन जेसीबी साह्याने घर पडून घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या अनोळखी लोकांच्या हातात दांडके होते तर या इसमानी बंटी गुंजाळ आणि चंद्रशेखर गुंजाळ यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. तसेच चंद्रशेखर गुंजाळ यांच्या पत्नीचाही अंगावर यातील काही तरुण धावून गेले इसमांपैकी 09 ते 10 इसमांनी बंटी बरोबर बाचाबाची करुन, तुला आता जिवंत नाही ठेवणार, तुला ठार मारून टाकणार असे म्हणुन त्यास लाकडी दांडक्याने, सिमेंट ब्लकने, लाथाबुक्क्याने जोरजोरात मारहाण करण्यास सुरूवात केली होती.

वास्तविक पाहता या घराचा वाद कुटुंबात चालू असून एका भावाने परस्पर हे घर विक्री केल्यामुळे ही वडिलोपार्जित मिळकत असल्याने चंद्रशेखर गुंजाळ हे त्या ठिकाणी राहत होते मात्र आता हा वाद टोकाला गेला असून याप्रकरणी तपास आता तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular