अहमदनगर दि.२३ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या एका पुरातन शिव मंदिरात असलेल्या महादेवाच्या पिंडीची अज्ञात लोकांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत तक्रार देण्यासाठी आता कोतवली पोलीस ठाण्यात मंदिराच्या विश्वस्तांसह या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी मोठे गर्दी केली आहे.
पुरातन मंदिर असलेल्या कपिलेश्वर मंदिरात हा प्रकार घडला असून हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर आता याबाबत तक्रार देण्यासाठी विश्वस्तांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.