अहमदनगर दि.२३ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या कपिलेश्वर पुरातन शिव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची अज्ञात लोकांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडतात अहमदनगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी मंदिराची पाहणी केली असून याबाबत आता मंदिराचे विश्वस्त आणि भाविक कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मंदिराचे विश्वस्त पुजारी यांच्यासह अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप उपमहापौर गणेश भोसले अभिजीत खोसे, प्राध्यापक माणिक विधाते अविनाश घुले आदीं कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत.
पुरातन मंदिर असलेल्या कपिलेश्वर मंदिरातील पिंडीवर ओरखडे ओढल्याचे दिसत असून हे ओरखडे धारदार वस्तूने केल्याचा प्रकार आहे दूध टाकल्यावर हे ओरखडे चांगल्या प्रकारे लक्षात येतात.