Home विशेष पैसा झाला मोठा… अखेर दहा हजार रुपयांचे नाणे आले बाजारात… नाणे...

पैसा झाला मोठा… अखेर दहा हजार रुपयांचे नाणे आले बाजारात… नाणे पाहण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड..नाणे खरे की खोटे अद्याप संभ्रम..आर बी आय कडून अद्याप घोषणा नाही.

अहमदनगर दि.२० ऑक्टोबर

भारतीय टंकसाळीत तयार झालेले दहा हजार रुपयांचे नाणे चलनात आल्यामुळे हे नाणे पाहण्यासाठी नागरीक चांगलीच गर्दी करत आहेत.अनेकांना अजून हे नाणे खरे आहे का खोटे आहे हे माहित नसल्यामुळे या दहा हजार रुपयांच्या नाण्याबाबत सध्या लोक संभ्रमाअवस्थेत आहेत.

अहमदनगर शहरातील नगर पाथर्डी रोडवर असलेल्या संजवनी हॉटेलचे चालक सुधीर वायकर यांना हे दहा हजार रुपयांचे नाणे एका ग्राहकांनी दिल्यानंतर ते थोडा संभ्रम अवस्थेत होते चांदीच्या रंगाप्रमाणे चकाकणारे हे नाणे या नाण्याचा एका बाजूला दहा हजार रुपयांचा आकडा असून दुसऱ्या बाजूला रवींद्रनाथ टागोर यांचे चित्र असून रवींद्रनाथ टागोर यांची 150 वी जन्म जयंती असे हिंदी आणि इंग्रजीत छापण्यात आले आहे.1861 ते 2011 असा कालावधी या नाण्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्या फोटो खाली छापण्यात आलं आहे.

आज पर्यंतच्या नोटांच्या आणि नाण्यांच्या मूल्यात सर्वात मोठे भारतीय चलनाचे नाणे म्हणून या नाण्याची इतिहासात नोंद होऊ शकते. 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटा सध्या चलनात वापरण्यात येत आहे. मात्र आता दहा हजार रुपयांचे नाणे चलनात आले तर अनेकांच्या उपयोगी पडू शकते कमी जागेत जास्त रक्कम एकाच वेळी वापरण्यासाठी हे नाणे उपयोगी पडू शकते. त्याचबरोबर जर हे नाणे हरवले तर जवळपास दहा हजार रुपयांचा फटका एकाच वेळी बसू शकतो आणि चोरीला गेले तर तेव्हाही मोठी रक्कम एकाच वेळी चोरी जाऊ शकते हा ही तोटा या चलनी नाण्यातून होऊ शकतो. मात्र आता हे नाणे बाजारात आल्यामुळे ते पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सुधीर वायकर यांच्या हॉटेलवर गर्दी केली आहे.

मात्र आरबीआयच्या वेबसाईटवर या नाण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे हे नाणे खरे की खोटे की भेट वस्तू म्हणून देण्यात येणारे नाणे आहे या अद्यापही कोणी सांगू शकत नाही मात्र दहा हजार रुपयांचे नाणे हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version