Homeजिल्हाडोंगरगण येथील गणपतराव मते पाटील विद्यालयात तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न...

डोंगरगण येथील गणपतराव मते पाटील विद्यालयात तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न ग्रामीण भागात खेळाचे महत्व वाढले पाहिजे – सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे

advertisement

अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर –
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे शालेय क्रीडा स्पर्धेमधून विद्यार्थी घडाला जातो. अभ्यासाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्व खेळालाही आहे. डोंगरगण येथील निसर्गरम्य गणपतराव मते पाटील विद्यालयात तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरू झाले आहे शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले.
            नगर तालुक्यातील डोंगरगण येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या हस्ते संपन्न झाले समवेत आदर्श गाव मांजरसुंबा गावचे मा.सरपंच जालिंदर कदम, कमिन्स कंपनीचे प्लॅट हेड संजय बाबर, सोमनाथ चॅटर्जी, तुकाराम वाखारे, महेश भराडीया, सरपंच वैशाली मते, मंगल कदम, राधिका प्रभुणे, बबन पठारे, संतोष पठारे, कैलास पठारे, रामदास भुतकर, अक्षय कदम, जगदीश भराडिया, इंद्रभान कदम, जागृतीताई भराडीया, रामेश्वर निमसे, भारती बनकर, आदिनाथ मते आदी उपस्थित होते.

           यावेळी माजी सरपंच जालिंदर कदम म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच खेळाची गोडी निर्माण व्हावी यासाठी गणपतराव मते पाटील विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुक्यातील विविध विद्यालयांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे कमिन्स कंपनी ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आदर्श गाव मांजरसुंबा व डोंगरगण येथील गणपतराव मते पाटील विद्यालयाला सहकार्य करीत आपले कर्तव्य पार पाडण्याची काम केले आहे असे ते म्हणाले.डोंगरगण येथील गणपतराव मते पाटील विद्यालयात कमिन्स कंपनीच्या वतीने डिजिटल क्लासरूम, शालेय पडवी व खिडक्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची ओळख होण्यासाठी कमिन्स कंपनीने पुढाकार घेतला आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular