Home क्राईम नागर,पुणे जिल्ह्यात धुडगूस घालणारा दरोडेखोर प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे याला जेरबंद...

नागर,पुणे जिल्ह्यात धुडगूस घालणारा दरोडेखोर प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील दरोड्याचीही कबुली

अहमदनगर दि.२१ ऑक्टोबर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील धोत्रे बुद्रुक या गावामध्ये सावळेराम देवराम भांड यांच्या घरी पाच सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून भांड यांच्या घरातील लोकांना आणि शेजारील घरातील लोकांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवत मारहाण करून घरातील सुमारे एक लाख 40 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरोड्याची घटना घडल्यानंतर पारनेर पोलीस या दरोड्याचा तपास करत असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकॉ/सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रोहित येमुल, विजय धनेधर व चापोहेकॉ/बबन बेरड आशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी हे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद या ठिकाणी एका घरात आसरा घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रांजणगाव मशीद गाव परिसरात प्रदीप काळे याच्या राहत्या घराजवळ साध्या वेशातील पोलिसांना टेहाळणी साठी पाठवले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच प्रदीप काळे आणि निमकर अर्जुन काळे त्यांनी दुचाकीवरून पळ काढला मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे, वय 20 ) निमकर अर्जुन काळे, वय 21, दोन्ही रा. रांजणगांव मशिद, ता. पारनेर) या दोघांनीही पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील दरोडा टाकल्याची कबुली दिली असून त्याचबरोबर,कान्हुर पठार व कन्हेर ओहळ, येथे घरात घुसून चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ कूमार अग्रवाल साहेब,अजित पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version