Homeक्राईमबकरी चोर झाला मंगळसूत्र चोर.. नगर शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरी करणाऱ्या...

बकरी चोर झाला मंगळसूत्र चोर.. नगर शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोघांना अटक आठ मंगळसूत्र चोऱ्यांच्या तपास स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

advertisement

अहमदनगर दि.१६ जून

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीला पकडले असून या आरोपींकडून सुमारे आठ लाख बारा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत नगर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपी पकडण्यात आले आहेत.

सलीम गुलाब शेख आणि फिरोज उर्फ लखन अजिज शेख या दोन मंगळसूत्र चोरांना अटक करण्यात आली असून शहरातील आठ मंगळसूत्र चोरीचा तपास या दोन आरोपींकडून लागला आहे.

ज्या पकडलेल्या आरोपींवर नगर शहरातील तोफखाना भिंगार कॅम्प तसेच राहुरी एमआयडीसी नगर तालुका पारनेर नेवासा या ठिकाणी गंभीर गुन्ह्यांची नोंद असून या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वर्तवली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, मनोहर शेजवळ, पोहेकों/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, मनोज गोसावी, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, शरद बुधवंत, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरदंले, भिमराज खसे, पोकों मच्छिद्र बडे, प्रशांत राठोड, मपोकों/ज्योती शिंदे व चापोहेकों/संभाजी कोतकर यांनी केलीय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular