अहमदनगर दि.७ ऑक्टोबर
पारनेर तालुक्यातील सुपा शेजारील म्हसने फाटा या भागात राहणाऱ्या सुनील शंकर नगरे या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात डिझेल अंगार ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र ही घटना वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी तो हाणून पाडला.
सुनील शंकर नगरे या शेतकऱ्याने खाजगी सावकारांनी हडप केलेली जमीन परत मिळावी या मागणीची कोणी दखल घेत नसल्याने गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
नगरे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील उक्कलगाव व पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील खाजगी सावकारांकडून अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते . त्या बदल्यात त्यांची ५० गुंठे जमीन गहाण ठेवली होती.मात्र कर्जापोटी एकूण १० लाख रुपये देऊनही सावकारांनी जमीन परत दिली नाही. उलट जीवे मारण्याची धमकी दिली, अशी त्यांची तक्रार सुनील नगरे यांची असून या बाबत जिल्हा उपनिबंधक,तालुका उपनिबंधक, जिल्हाधिकारी यांच्याकडे दखल घेतली तक्रार मात्र खाजगी सावकारांवर कोणती कारवाई केली जात नसल्याने अखेर न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला असून याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी नगरे यांच्याविरुद्ध आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.