अहमदनगर दिनांक ११ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरामध्ये मिठाई दुकानदार व्यापारी धीरज जोशी यांच्यावर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास किर्लोस्कर कॉलनी परिसरात जीवघेणा हल्ला झाला ही घटना झाल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या ( डी बी ) वर कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी पत्रकार पोहोचले त्यानंतर पोलीस आले म्हणजे एखादी घटना घडली तर पोलीस लवकर येत नाही हे असं नेहमी बोलले जाते मात्र या ठिकाणी त्याचा अनुभव नागरिकांनीही घेतला.
जेव्हा काही पत्रकारांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना फोन केले तेव्हा तेही या घटनेपासून अनभिज्ञ होते.
तोफखाना पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या गुलमोहर रोडवर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या वाढदिवसानिमित्त डीजे लावून शेकडो लोक नाचत होते. मात्र त्याचा आवाज तोफखाना पोलीस स्टेशनला गेला नाही हे पण विशेष. तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक (डी बी ) नेमके कोणत्या गुन्ह्याचा शोध घेत असतात हे समजण्या पलीकडे आहे.कारण ज्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा किंवा त्याचबरोबर कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गेल्या काही महिन्यांपासून जी कामगिरी केली आहे. त्यामानाने तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक फक्त नावालाच आहे का काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये नगर शहरात झालेले खून आणि विशेषतः तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेले खून याबाबतही गुन्हे शोध पथक सपशेल फेल गेले आहे. कारण स्थानिक गुन्हे शाखा आरोपी पकडत असतील तर मग तोफखाना पोलीस स्टेशनची डीबी नेमकं काय करत असते.
तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजरोसपणे गुंडागर्दी वाढू लागली आहे. आता तोफखाना पोलीस स्टेशनला नवीन अधिकारी आले आहेत त्यांनी आपला दांडूका या गुन्हेगारांवर फिरवणे गरजेचे आहे. अनेक चौका चौकात तरुणांचे टोळके उभे असतात तर रात्री तोफखाना पोलीस स्टेशनच्या आसपास सूनसान भर रोडवरच दारू पिण्यासाठी तोलकेच्या टोळके उभे असतात रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करणे आणि फटाकडे वाजवणे ही प्रथा आता तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्रास होऊ लागली आहे. त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक आहे का नाही हाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षकांनी आता पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुंडांवर टवाळखोरांवर आपल्या कायद्याचा दंडूका फिरवणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असून जनतेच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात कारण येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे या काळात अनेक राजकीय गोंधळ आणि समस्या निर्माण होणार आहेत त्यामुळे साहेबांनी आत्तापासूनच कायद्याच्या धाकात सर्वांना ठेवणे गरजेचे आहे.
गुन्हे शोध पथकाबाबतही आता निर्णय घेणे गरजेचे आहे नुसते गुन्हे शोध पथक स्थापन करून गुन्ह्याचा शोध लागत नसेल तर अशा गुन्हे शोध पथकाचा उपयोग काय ? तोफखाना पोलीस स्टेशनच्या जवळच अनेक प्रकरण रोज घडत आहेत मात्र त्याचा उलगडा होत नाही दुचाकी चोरांचा आणि मंगळसूत्र चोरी आणि इतर मोठ्या चोऱ्यांच्या तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावलेला आहे. त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशनची डीबी फक्त शोभेल तेच आहे का काय त्यामुळे नवीन पोलीस निरीक्षकांनी या डी बी बाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे आणि नवीन माणसांना संधी देऊन जास्तीत जास्त गुन्हे उलगडण्यासाठी सर्वांची मदत घेणे गरजेचे आहे. तरच जनतेच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण होऊ शकतो.