Home Uncategorized उध्दव साहेब तुमच्या या बडव्यांमुळे आम्हाला खूप त्रास होतो नगर संपर्क प्रमुखांवर...

उध्दव साहेब तुमच्या या बडव्यांमुळे आम्हाला खूप त्रास होतो नगर संपर्क प्रमुखांवर गंभीर आरोप करत आपण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचा नगरसेवकाची व्हिडीओ क्लिप व्हायरल

अहमदनगर दि. २४ जून

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता आमदार उघडपणे आपलं मत मांडू लागले आहेत. शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी त थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत. तुमच्या आजूबाजूचे जे बडवे आहेत त्यांच्या मुळे आमदार असो व सामन्य शिवसैनिक यांना तुमच्या जवळ जाऊ दिले जात नव्हते.

त्याचप्रमाणे आता राज्यातील ठीक ठिकाणी असलेल्या शिवसैनिकांमध्ये बडव्यांन विरुद्धचा राग बाहेर येऊ लागला आहे. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लावण्यात आली आहेत. अहमदनगर शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव यांची एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांवर चांगलेच गंभीर आरोप केले आहेत आणि आपण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी या व्हिडिओ क्लिप मध्ये सांगितला आहे.

पहा व्हिडीओ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version