अहमदनगर दि.३० जानेवारी
119 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक आता बंद झाली आहे संचालकांनी आणि बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कर्ज घोटाळा केल्यामुळे ही बँक बंद पडली असून आता या बँकेच्या गैरव्यवराबाबत तक्रार करणारी राजेंद्र गांधी यांच्या पिराजीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे या प्रकरणात आत्तापर्यंत 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अनेक गंभीर गोष्टी आता समोर येत आहेत.
नगर अर्बन बँकेच्या घोटाळेबहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे सत्र सुरू केल्यानंतर अनेक संचालक घरादारासह पळून गेल्याची चर्चा सध्या नगरमध्ये आहे अनेकांच्या घरांना आता कुलूप लागले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्ज मंजूर उपसमिती, अशी विविध पदे भूषविलेल्या अशोक माधवलाल
कटारिया याला पोलिसांनी आळेफाटा येथून आपल्या नातेवाईकाकडे लपून बसलेला असताना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. पदाचा गैरवापर करून त्याने कुवत नसलेल्या कर्जदारांना कर्ज मंजुरीची शिफारस केली होती. त्याच कार्यकाळात मंजूर उपसमितीकडून ७२ कोटी ७५ लाखांचे कर्ज वितरित गेले असल्याचा प्रकार समोर आला आहे . या प्रकरणात आत्तापर्यंत 13 आरोपी झाले असून याआधी मनेष साठे आणि अनिल कोठारी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र आता अटकेच्या भीतीने अनेक संचालक पळून गेले असल्याची चर्चा सध्या नगरमध्ये जोरात सुरू आहे.