Homeशहर"विमलला" पावले बाबा अवैद्य गुटखा तस्करीत .. बाब आला आणि सर्वांना पाऊण...

“विमलला” पावले बाबा अवैद्य गुटखा तस्करीत .. बाब आला आणि सर्वांना पाऊण गेला… भोंदू बाबा अनेक ठिकाणी दिसतात मात्र आता थेट अवैध गुटख्याच्या तस्करीत भोंदू बाबाचा प्रवास.. नगर जिल्ह्यात चाललय काय

advertisement

अहमदनगर दिनांक 2 जानेवारी

भारत (india )देश हा धार्मिकतेच्या बाबतीत फार पुढे आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण जगामध्ये भारतात लोकशाहीचे चर्चा होते त्याचप्रमाणे धर्म आणि कर्मकांड याबाबतही भारत देश अग्रेसर आहे. यामुळे चांगल्या कर्मयोगी आणि सिद्धी पावलेले महाराज आपल्या भारतात आहेत मात्र याचबरोबर काही भोंदू बाबा (baba) या धार्मिकतेचा गैरफायदा घेत असतात अनेक वेळा या भोंदू बाबांचा पर्दाफाशही झालेला आहे.

अहमदनगर (ahmednager) शहरात अवैध गुटखा तस्करी अनेक दिवसांपासून होत आहे. दर सहा महिन्याला या अवैध गुटखा तस्करीचा म्होरक्या बदलत असतो लाखो रुपयांची लक्ष्मी या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात येत असते. अन्न औषध प्रशासन (food & drugs) यांच्याकडे कमी असलेल्या मनुष्यबळामुळे कारवाई फार तुरळक प्रमाणात करताना दिसतात. तर पोलीस काही ठिकाणी अवैध गुटखा तस्करीवर कारवाई करतानाचे चित्र नेहमी पाहायला मिळतं. मात्र या अवैद्य गुटका तस्करी मागे एक मोठे रॅकेट असून लाखो रुपयांची लक्ष्मी दर महिन्याला अत्यंत पद्धतशीरपणे पोहोच केली जात असते.

अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक जिल्हा आहे कानामात्रा नसलेल्या या अहमदनगर जिल्ह्यात अनेक चांगले निर्णय, कायदे होऊन गेले आहेत. तर नगर शहर हे नेहमीच अशा वेगळ्या गोष्टीं मुळे चर्चेत असते. आता तर थेट भोंदू बाबाच गुटखा तस्करी मध्ये आले असल्यामुळे ही चर्चा तर होणारच ना!

या धंद्यात आता एका भोंदू बाबा ने प्रवेश केला असून या भोंदू बाबाच्या माध्यमातून “विमल* नावाचा गुटखा ज्याच्यावर महाराष्ट्र मध्ये बंदी आहे तो गुटखा नगरमध्ये आणण्याचा ठेका आता या भोंदू बाबाकडे आला असल्याची खात्री लायक माहिती आहे.तरुणांना व्यसनाधीन करणारे आणि अनेकांना कॅन्सर सारखे आजार देणाऱ्या या गुटखा तस्करीत भोंदू बाबांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे भोंदू बाबा पैसे कमावण्यासाठी काहीही करू शकतात असंच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी होऊन अनेक वर्ष झाले आहेत मात्र तरीही विमल, हिरा आणि माणिकचंद यासारखे गुटखा पुड्या आजही सर्रास विक्री केल्या जातात याची दर महिन्याला करोडो रुपयांची उलाढाल होत असते.

बाबांनी असे उद्योग केल्याने अनेक चांगले काम करणाऱ्या बाबांचे मात्र नाव खराब होते.बाबांनी तरुणांना व्यसनापासून दूर होण्याचा सल्ला देण्याची गरज असताना थेट बाबाच आता या विमलच्या धंद्यात उतरल्याने बाबांनी आता ठरवले आहे की तरुण पिढीला व्यसनाधीन बनवायचचं असंच म्हणायला हरकत नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular