अहमदनगर दि.२ जानेवारी
अहमदनगर शहरातील 113 वर्ष जुनी असलेली आणि एक लाख पंधरा हजार सभासद असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकचा रिझर्व बँकेने लायसन रद्द करून ही बँक बंद केली आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक ठेवीदारांचे ठेवी बँकेत अडकल्या असून ठेवीदार ठेवी मिळवण्यासाठी बँकेचे उंबरे झीजवत आहेत मात्र ठेवी परत मिळत नसल्याने अनेक ठेवीदार हवलादिल झाले आहेत.
अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यामुळे त्यांना विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे. काही ठेवीदारांच्या घरातील मुलांचे लग्न, कौटुंबिक समस्या, आजारपण यासाठी बँकेत ठेवी ठेवल्या होत्या मात्र नगर अर्बन बँकेत झालेला कर्ज घोटाळा यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले आणि अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले.काही जणांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि परदेशात नोकरीसाठी पैसे लागतील म्हणून ठेवी ठेवल्या होत्या मात्र त्या मुलांचे स्वप्न आणि आयुष्य उध्वस्त झाल्या आहेत.
मागील आठवड्यात संतप्त झालेल्या काही ज्येष्ठ ठेवीदारांनी अर्बन बँकेत जाऊन अर्बन बँकेचे माजी चेअरमन आणि स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या फोटो काढून तो बँकेसमोर ठेवून त्याला ज्येष्ठ ठेवीदार महिलांनी चपला मारल्या होत्या यानंतर काही ठेवीदारांवर माजी संचालकांकडून चांगलाच दबाव आणला जात आहे.तर काही ठेवीदारांना धमक्याही दिल्या जात असल्याचे सोशल मीडियावरून ठेवीदारांनी सांगितले आहे. बँक बचाव समिती ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात म्हणून प्रशासकांकडे जाऊन वारंवार संपर्क साधत आहेत तर आरोपींना कडक शासन व्हावे आरोपींना अटक व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट दोन दिवसांपूर्वी अर्बन बँक बचाव समितीने घेतली होती. या अर्बन बँक कर्ज घोटाळ्यातील अनेक घोटाळेबाज संचालक सध्या नगर शहरात खुलेआम फिरत असून यांना कायद्याचा धाकच नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेवीदारांच्या डोळ्यात असू तर भ्रष्टाचारी संचालकांच्या तोंडावर हसू अशी परिस्थिती सध्या अर्बन बँकेची झाली असून आता ठेवीदार तीन जानेवारी रोजी नगर शहरातील स्वस्तिक चौक येथे रस्ता रोको करून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे पुरावे सादर करणार असल्याची माहिती अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने देण्यात आली आहे. नगर पुणे रोडवरील स्वस्तिक चौक होते 3 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता हा रस्ता रोको होणार आहे.