अहमदनगर दि.२३ मार्च
कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ इंजीनिअरींग
कॉलेज येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरिय
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिला पोलीस हवालदार
अर्चना काळे यांनी ५२ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला तर पोहेकॉ अरविंद भिंगारदिव
यांनी १०५ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक
मिळविला. सीनिअर व मास्टर गटसाठी महाराष्ट्रातून
300 स्पर्धक सहभागी होते. दोन्ही खेळाडुंना नेस्ट लेवल फिटनेस जीमचे संचालक ओंकार गुरम तसेच प्रशिक्षक विजय कनोजिया पोहवालदार उमेश इंगवले यांचे प्रशिक्षण लाभले. अर्चना काळे व भिंगादिवे यांचे
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी यशाबद्दल
सत्कार केला.