अहमदनगर दि.२ मार्च
अहमदनगर शहरातील बाराखडी हडको येथील एका वीस वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस वर वादग्रस्त स्टेटस ठेवला नाही त्याच्यावर तोफखाना स्टेशनमध्ये भादवि कलम 505 (2) प्रमाणे पोलीस कर्मचारी तनवीर सलीम शेख यांच्या फिर्यदिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजल अरिफ सय्यद या तरूणाने मोबाईलच्या स्टेटस मध्ये मिटा दुंगा भगवे का नाम या स्लोगनमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटस ला ठेवून धार्मिक व जातीय शत्रूत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असे कृत केले म्हणून त्याच्या विरोधात पोलिसांनी स्वतः फिर्यादी देऊन गुन्हा दाखल केला आहे सोशल मीडियावर कोणतीही वादग्रस्त विधाने करू नयेत अथवा व्हाट्सअप स्टेटस ला वादग्रस्त होईल असे स्टेटस ठेवू नये असे आवाहन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी केले आहे.