अहमदनगर दि.२ एप्रिल
:न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहमदनगर येथील प्रा. डॉ. थोरात राहुल दगडू याना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी “वाणिज्य आणि व्यवस्थापन” या विद्याशाखेतील
विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली. डॉ. आर.डी. थोरात यांनी “अ स्टडी ऑफ रूरल डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम्स अँड स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय द रूरल डेव्हलोपमेंट एजन्सी (डी.आर.डी.ए.) अहमदनगर, महाराष्ट्र” या विषयावर त्यांनी शोधप्रबंध पूर्ण केला यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील डॉ. मेघना भोसले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्वतः कृषी पदवीधर असल्याने आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग ग्रामीण भागातील लोकांसाठी व्हावा यासाठी त्यांनी पीएच. डी इतर विषयात न करता त्यांनी त्यासाठी ‘कॉ ओप्रेशन अँड रूरल डेव्हलोपमेंट’ हा विषय निवडला. सदर संशोधन शास्त्रीयदृष्ट्या दर्जेदार, उत्कृष्ट होण्यासाठी अहमदनगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रेंतील प्रकल्प संचालक श्री. सुनील पठारे, महाविद्यालयातील माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. व्ही. गीते बी.बी.ए. विभाग प्रमुख डॉ. मंगेश वाघमारे, डॉ. सतीश जगताप यांचे सतत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. त्यांच्या या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष आणि त्यांनी त्यावर त्यांनी सुचवलेले उपाय हे जिल्हा ग्रामीण यंत्रणा याना ग्रामीण स्तरावर विविध शासकीय योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करताना उपयुक्त ठरणार आहेत.
सन २०११ पासून डॉ. आर. डी. थोरात अहमदनगर मधील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या वरिष्ठ महाविद्यालयातील बी.बी.ए. विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी. एम. कॉम, एम.बी.ए., सेट, पेट, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस, बी.कॉम, बी.एस्सी (कृषी) यासारख्या परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत. अध्यापनाचे काम करत असताना डॉ. आर.डी. थोरात हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करत
आहेत.
व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास, औद्योगिक क्षेत्र भेटी, शैक्षणिक प्रदर्शन, विद्यार्थी आरोग्य समिती, कमवा आणि शिका समिती, प्लेसमेंट आणि ट्रेनिंग सेल, विद्यार्थी प्रवेश समिती स्पर्धा परीक्षा समिती, करिअर मार्गदर्शन यासारख्या उपक्रमात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. महाविद्यालयात याबरोबरच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्नित एम.बी.ए. अभ्यासकेंद्रामध्ये कॉन्सिलर म्हणून ते काम करत आहेत. तसेच स्पर्धापरीक्षा केंद्रामध्ये देखील ते अध्यापनाचे काम करत आहेत.आजतागायत त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवर त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची वाणिज्य व्यवस्थापन या विषयांची अनेक पुस्तके त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलेली आहेत. अध्यापनाच्या कामाबरोबर त्यांचे सामाजिक क्षेत्रात रक्तदान, आरोग्य विषयक शिबीर, दन्त तपासणी शिबीर, सायकल रॅली, वृक्षारोपण या सारख्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कामाच्या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा. नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष मा. रा. ह दरे, सचिव मा.जी. डी. खानदेशे साहेब, सहसचिव अँड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार मा. डॉ. विवेक भापकर , कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य, प्रबंधक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.