Homeदेशबारमध्ये जाताना जपून, स्टाटर म्हणून चिकन ऐवजी कबुतर तर खात नाही ना...

बारमध्ये जाताना जपून, स्टाटर म्हणून चिकन ऐवजी कबुतर तर खात नाही ना ?

advertisement

मुंबई, 27 नोव्हेंबर –
कबुतर हे पक्ष्यांचा कक्षेत मोडतात. त्यांचा वापर रेस्टोरंट आणि बारमध्ये खाद्यपदार्थ म्हणून केला जात असेल तर हा अतिशय धक्कादायक प्रकार असून असा प्रकार मुंबईत घडत असल्याचे गगलानी यांनी म्हटलं आहे.निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन हरीश गगलानी यांनी रेस्टोरंट मध्ये चिकन ऐवजी कबुतरांचे मांस दिले जात असल्याची तक्रार केलीय. दरम्यान याबाबत मुंबईच्या सायन (शिव) पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मुंबईत काही बारमध्ये स्टाटरसाठी कबुतर खायला देत असल्याचा धक्कादायक प्रकार निवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या निदर्शनास आला आहे. हा प्रकार कॅप्टन हरिश गगलानी यांनी उघडकीस आणला आहे. त्यांनी मुंबईतील बारमध्ये कबुतरे खायला देत असल्याचा आरोप पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेत तक्रार दाखल करून घेतली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे.

संबंधित रेस्टोरंटमध्ये स्टार्टर म्हणून कबुतराच्या वापर होतोय का याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोप सिद्ध झाल्यास या रेस्टोरंट आणि बार चालकांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular