Homeशहरपूर्वीच स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी आवश्यक असलेल्या जागामालकाने आयुक्तांना भेटून जागा देण्याची दर्शवली...

पूर्वीच स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी आवश्यक असलेल्या जागामालकाने आयुक्तांना भेटून जागा देण्याची दर्शवली तयारी

advertisement

अहमदनगर दि.१ डिसेंबर

32 कोटी रुपये देऊन स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी नवीन जागा खरेदी करण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. या ठरावाला सत्ताधारी शिवसेनेसह ,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, बसपा आणि भारतीय जनता पक्ष ज्या काही नगरसेवकांनी लेखी विरोध दर्शवला त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगल्या चर्चेत आहे.

आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आले असून ग.नं.२८/१ ही जागा स्मशानभूमीसाठी आणि दपन भूमीसाठी आरक्षित असून ही जागा महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्या बदल्यात रोख मोबदला अथवा पर्यायी जागा द्यावी अशी मागणी या जागेचे मालक बाळासाहेब बाजीराव सोनवणे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत औरंगाबाद हाय कोर्टामध्ये या जमिनीवर महानगरपालिका आणि सोनवणे यांच्यामध्ये वाद सुरू असताना औरंगाबाद हायकोर्टाने मोबदला किंवा पर्यायी जागा देऊन
तडजोड करण्याचे आदेश दिले आहेत. तरी जी जागा आरक्षित नाही ती जागा आरक्षित करून 32 कोटी रुपये देण्यापेक्षा जी जागा उपलब्ध आहे ती जागा महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular