अहमदनगर दिनांक १३ ऑक्टोबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या नागपूर बोल्हेगांव
भागातील प्रभाग क्रमांक सात मधील शिवसेनेच्या नगरसेविका कमल दत्तात्रय सप्रे यांनी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
कमल दत्तात्रय सप्रे या अहमदनगर मनपा हद्दी मधील प्रभाग क्र. ७ नागापुर-बोल्हेगांव भागातून पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक २०१८ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या मात्र महापालिका प्रशासन महापौर, पक्षाचे पदाधिकारी यांनी आम्हाला दुय्यम वागणुक दिली तसेच कोणत्याही प्रकारचे
स्थानिक विकासासाठी निधी दिला नाही. वेळोवेळी पाठ पुरावा करुन सुध्दा उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली नागापुर बोल्हेगांव च्या रस्त्यासाठी ४-४ वेळा आंदोलन केले तरी आमच्याकडे जानिवपूर्वक व हेतुपुर्वक दुर्लक्षक केले काही प्रभागात २० कोटी ते २४ कोटी चे कामे खतवण्यात आले परंतु प्रभाग क्र. ७ करिता कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही. अडीच वर्षापासुन स्थानिक कामाचे इस्टीमेट महापालिका कार्यालयात असुन ते खतविण्यात आले नाही. असा आरोप करत आजही प्रभागामध्ये रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुरावस्ता आहे ठेकेदाराने रस्ते खोदुन ठेवल्यामुळे नागरिकांना पायी चालने सुध्दा कठीन झाले आहे. या प्रभागात लहान मोठे अपघात झाले आहे तरी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. या भागात महापालिका प्रशासन व पदाधिकारी या भागातील जनतेला कोणत्याही नागरिसुविधा
पुरवण्यात अपयशी ठरले आहे पक्षाचे महापौर व पक्षाची नगरसेविका असल्याकारणामुळे नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. मागिल काळात वेळो वेळी आंदोलन झाले या आंदोलाना दरम्यान आमच्या कुटूंबावर राजकिय द्वेशातुन गुन्हे दाखल करण्यात आले. आमचा त्या बुट फेकीशी काही संबंध नसताना आम्हाला बदनाम करण्यात आले.
या प्रभागमध्ये लाईट, पाणी आणि ड्रेनेज च्या मोठ्याप्रमाणावर समस्या असुन या भागातुन मोठ्याप्रमाणवर कर वसुली होत असुन आमच्या नागरिकांवर अन्याय होत असुन एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणुन आणी पक्षाच्या वरिष्ठांनी केलेल्या अन्यायामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. नागापुर बोल्हेगांवकरांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणुन नैतिकतेने मी व माझे पती माजी नगरसेवक दत्तापाटील सप्रे पक्षाचा राजीनामा देत आहे. स्थानिक नागरिकांचा संयम सुटला असुन नागरिकांच्या आग्रहखातर व पक्षाने केलेला अन्याय लक्षात घेता राजीनामा देत असल्याचं या राजीनामा पत्रात म्हटला आहे.
आज शिर्डी येथे जाऊन संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची शिर्डी शासकीय विश्रामगृहा वर भेट घेऊन नगरसेविका कमलताई दत्तात्रय सप्रे मा.नगरसेवक दत्तापाटील सप्रे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब यांच्या कडे सुपूर्त केला समवेत इंजी.बबनराव कातोरे उपस्थित होते.