Homeजिल्हागरिबांच्या ताटातील घास हिसकवणारे भंडारी,बोरा यांच्या कडे पुन्हा सापडला रेशनिंगचा तांदूळ खोसपुरी...

गरिबांच्या ताटातील घास हिसकवणारे भंडारी,बोरा यांच्या कडे पुन्हा सापडला रेशनिंगचा तांदूळ खोसपुरी गावाच्या शिवारात रेशनिंगचा शासकीय तांदूळाचा ट्रक सहा लाख 73 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

advertisement

अहमदनगर दि.६ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रेशनिंगचा तांदुळाचा काळाबाजार उघडकीस आला असून मागील आठवड्यात मार्केट यार्ड मधील बोथरा पकडल्यानंतर आता रेशनिंगचा तांदूळ शेवगाव कडे नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. याबाबत हकीगत अशी की स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर औरंगाबाद रोडवरील शेवगाव रोडवर एका ट्रक मधून रेशनिंगचा तांदूळ घेऊन जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. दिनकर मुंडे, पोहेकॉ विजयकुमार बाळासाहेब बेठेकर,पोहेकॉ बापूसाहेब रावसाहेब फोलाणे, पोना शंकर संपत चौधरी, पोना लक्ष्मण चिधू खोकले,पोना सचिन दत्तात्रेय अडबल पोना 1संतोष शंकर लोढे, पोकों, जालिंदर मुरलीधर माने, चालक पोहेकॉ चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील पंढरपूर मार्गे शेवगाव कडे जाणाऱ्या एका ट्रकला पाठलाग करून पकडले या ट्रकमध्ये सुमारे तांदळाच्या 210 गोण्या असल्याच आढळून आल्या. ट्रक मधील चालक फारक फकीर मंहमद शेख याच्या कडे विचारपूस केली असता त्यांनी व त्याच्या सोबत असलेल्या कांतीलाल झुंबरलाल भंडारी यांनी सुरुवातीला पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली


अखेर कांतीलाल भंडारी याने दिलेल्या माहितीवरून तांदळाच्या गोण्या मुकेश बोरा( रा. बदले वली ता. शेवगाव) यांचे दुकानातून भरलेला असून तो रेशनचा शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदुळ असल्याचे सांगून दुस- या गोण्यांमध्ये भरुण विक्रीसाठी घेऊन चाललो आहे. असे सांगितले. त्यांचेकडे सदर तांदळाचे कोणत्याही प्रकारचे बीले आढळुन आले नाही.

या प्रकरणी आता ट्रक चालक फरक फकीर महमद शेख वय 30 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर व ट्रक मालक कांतीलाल झुंबरलाल भंडारी वय 54 वर्षे रा. खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर , मुकेश बोरा रा. बदले वाली ता. शेवगांव त्यांचेविरुध्द जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular