Homeविशेषअहो आश्चर्यम...या ठिकाणी चक्क नदीमधील फेसा मुळे झाला रस्ता जाम

अहो आश्चर्यम…या ठिकाणी चक्क नदीमधील फेसा मुळे झाला रस्ता जाम

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर शहरात कधी काय घडेल हे सांगता येत नाही आता तर चक्क निधीतील प्रदूषणामुळे त्या ठिकाणी फेस येऊन रस्ता आडवल्या चे चित्र नगर शहराचा शेजारून जाणाऱ्या वाकोडी ते वाळकी या रस्त्यावर दिसून आलंय. नगर शहरातुन वाहणारी सीना नदी किती प्रदूषित आहे याचं उदाहरण या साचलेल्या फेसा वरून लक्षात येत आहे. या मुळे चक्क रस्ता जाम झाल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते मात्र या प्रदूषणाकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी आज या सर्व प्रदूषणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून याकडे लक्ष वेधले आहे.

विशेष म्हणजे या सीना नदीवर पुढे कर्जत तालुक्यात मोठे धरण असून अनेक गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीला पाणी दिले जाते. त्यामुळे भविष्यात मोठ्या गंभीर आजारांना समोर जावे लागणार असल्याने आत्ताच या प्रदूषणाची दखल घेऊन योग्य ते कारवाई करणे गरजेचे आहे.

अन्यथा भविष्यात अनेक गंभीर परिणामांना सामोरे जायची वेळ येऊ शकते. प्रदूषण महामंडळाने याकडे आता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीमध्ये अनेक ठिकाणी केमिकलयुक्त पाणी सोडत असल्याने त्याचा परिणाम पुढे जाऊन अनेक गावांना भोगावा लागतोय त्यामुळे आता प्रदूषण महामंडळाने कठोर पाऊल उचलणे काळाची गरज आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular