Homeक्राईमदीपनगर-केडगाव येथे वेश्या व्यवसायावर संयुक्त छापा कोतवाली पोलिसांची दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर...

दीपनगर-केडगाव येथे वेश्या व्यवसायावर संयुक्त छापा कोतवाली पोलिसांची दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागासह कारवाई; दोन जणांवर गुन्हा दाखल

advertisement

📰 खबर अहिल्यानगरची

अहिल्यानगर प्रतिनिधी :
दीपनगर-केडगाव परिसरात वेश्या व्यवसाय चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित ठिकाणाहून एका पीडित महिलेला मुक्त करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव येथील एका ठिकाणी महिलांना वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यावर उपजीविका चालविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता कोतवाली पोलिस व दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाने संयुक्त छापा टाकला.
या कारवाईदरम्यान सईदा अफसर खान (वय ५४, रा. झेंडा चौक, केडगाव) व एम डी टुटुल मुल्ला वय ३७ वर्षे रा. पाईमाम, पोलीस स्टेशन ता. कुलना जिल्हा. कुलना बांगला देश यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी आढळलेल्या एका पीडित महिलेबाबत प्राथमिक चौकशीत ती परदेशी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९३/२०२६ अन्वये स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान संबंधित महिलेच्या पतीबाबत काही माहिती समोर आली असून त्याअनुषंगाने दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने पुढील तपास सुरू आहे. परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत तसेच अन्य बाबींची पडताळणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पोनि श्री नितीन देशमुख, पो.उप.निरी श्री गणेश देशमुख, सफौ सुनिल शिरसाट, पोहेकों, संतोष लगड, पोहेकों राहुल शिंदे, पोहेकों बाळकृष्ण दौंड, पोकों दिपक रोहकले, पोकों सुरज कदम, पोकों दत्तात्रय कोतकर, पोकों शिरीष तरटे, पोकों संदिप कव्हळे, पोकों सचिन लोळगे, पोकों सत्यम शिंदे, चापोकों पोटे, मपोना वर्षा पडीत, मपोकों पल्लवी रोहकले तसेच मोबाईल सेलचे पोकों राहुल गुंड्डु यांनी केली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular