लातूर दि १६ मार्च
लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका मोहल्ल्यात काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दशहत निर्माण करत होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १८ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. १४ मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीला त्याने मारहाण केली होती. त्या भागात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने विवेकानंद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली.
पोलिसांनी जागून झाला त्याच्या परिसरात जाऊन ताब्यात घेतले तसेच त्याची दहशत मोडावी म्हणून गौस मुस्तफा सय्यद याला पोलिसी खाक्या दाखवत त्याची पोलीस स्टेशनपर्यंत वरात काढली. पकडायला गेलेल्या पथका मधील महिला पोलिसाने गौस मुस्तफा हा गुंड ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही अवस्था केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिला पोलिसाच्या या फटक्यांमुळे इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.
