Home राजकारण आमदार संग्राम जगताप यांनी किरण काळेंनी पाठवलेली ‘ती भेटवस्तू’ नाकारली!

आमदार संग्राम जगताप यांनी किरण काळेंनी पाठवलेली ‘ती भेटवस्तू’ नाकारली!

अहमदनगर दि.११ फेब्रुवारी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर चुम्मा चुम्मा दे दे… गाण्यावर नाचण्यावरून शहरात गेल्या काही दिवसापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत तरकाँग्रेसच्यावतीने किरण काळे यांनी राष्ट्रवादीचे शहराचे तरुण आ. संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची चरित्रे, पुस्तके भेट म्हणून पाठविली होती.

या महापुरुषांच्या विचारांना समजून घेण्यासाठी त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांना दिला होता. आमदारांचा अभ्यास वर्ग घेण्याची देखील तयारी दाखविली होती. मात्र कुरियरद्वारे पाठविलेली महापुरुषांची चरित्रे स्वीकार करण्यास नकार देत परत पाठविण्यात आला असल्याचा निंदनीय प्रकार घडला असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. हा या महापुरुषांच्या चरित्रांचा अवमान असल्याचे देखील काँग्रेसने म्हटले आहे.

ज्या खासगी कुरियरने  आमदारांना पाठवण्यात आली होती त्याच्या ऑनलाइन पोर्टलवर “नॉट डीलिवर्ड – रिसिवर रिफ्युजड डिलिव्हरी” म्हणजे ज्यांच्या नावे महापुरुषांची चरित्रे पाठवण्यात आली आहेत त्याने ती स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे सदर कुरियर हस्तांतरित होऊ शकले नाही असे दर्शविण्यात आले आहे. सदर पोर्टलवरील माहितीच काँग्रेसने प्रसार माध्यमांना उपलब्ध करून दिली आहे.

काँग्रेसने याबाबत म्हटले आहे की, आयुर्वेदाचार्य गुणे शास्त्री यांच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयाच्या आवारातील त्यांच्या पत्त्यावर महापुरुषांची चरित्रे आम्ही पाठविली होती. महाविद्यालय हे तरुणांना शिक्षित करण्याचे केंद्र म्हणून जगात ओळखले जाते. महाविद्यालय ही ज्ञानार्जन करण्याची जागा असते. मात्र चांगल्या विचारांचे ज्ञानार्जन करण्यात शहराच्या लोकप्रतिनिधी यांना रसच नसल्यामुळे त्यांची तीच विचारसरणी महापुरुषांची चरित्रे नाकारण्यातून दिसून आली आहे. यात निश्चितच आश्चर्यकारक व धक्कादायक असे काही नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहेत.

त्यामुळे महापुरुषांची आमदारांनी नाकारलेली चरित्रे शहरातील तरुणाईला उपलब्ध करून देणार असल्याचे काँग्रेसने म्हटल आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version