राहता दि.९ फेब्रुवारी
विखे-पवारांच्या संघर्षाची झलक संसदेतही पाहायला मिळाली. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी संसदेतील भाषणात सहकाराचे काही मुद्दे मांडले होते आणि युपीए च्या सरकारवर टीका केली होती त्या नंतर राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांनीही प्रत्युत्तर दिलं होत
यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावं.. माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे, असं त्या म्हणाल्या. यूपीए सरकारमध्ये असताना सुजय विखे यांचे वडील मंत्री होते. त्यावेळी गांधी परिवाराशी ते भेटायचे. त्यावेळी जी धोरणं तयार केली गेली त्यात ते होते, त्यामुळं खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं मला माझी संस्कृती सांगते, असं सुळे म्हणाल्या होत्या.
त्या नंतर आज सुजय विखे यांनी राहता येथे रस्ता कामाच्या भूमिपूजना निमित्त आयोजित केलेल्या या प्रसंगी बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे आपण कोणाच्या बापाचं खाल्लं की नाही आणि आपण कुणाला माहितही नाही असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे जोरदार टीका केली आहे.
पहा व्हिडीओ 👇👇