Home क्राईम तपासा साठी आणलेल्या सराफ व्यावसायिकावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार प्रकरण,प्रकरणाचं तपास...

तपासा साठी आणलेल्या सराफ व्यावसायिकावर पाेलिस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार प्रकरण,प्रकरणाचं तपास सीआयडी कडे द्या – भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

अकोले दि.२१ जानेवारी
अकोले जिल्ह्यात शरमेने मान खाली घडणारी घटना घडली असून एका सराफ व्यवसिकाने पोलीस कोठडीत असताना आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचर केल्याचा आरोप केल्याने अकोले पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सराफ व्यवसिकाने अनैसर्गिक लैगिक अत्याचार केल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

९ जानेवारीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री ३ वाजता शेगावातून अटक केली होती.रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती या दरम्यान सोने चोरी प्रकरणात आधीच अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना सराफ व्यावसायिका समोर आणण्यात आल आणि यावेळी दोघांनाही त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे आरोपी सराफा व्यापारी यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षकास तसेच पोलिस कर्मचाऱ्याची मुख्यलयात बदली करण्याची कारवाई करण्यात आली. मात्र आता या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून या प्रकरणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे आणि प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version