पाथर्डी दि.३ एप्रिल
पाथर्डी शहरातील जुन्या पंचायत समितीच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये आयपीएल क्रिकेट वर सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास पाथर्डी पोलिसांनी सट्टा घेणाऱ्या इसमावर छापा टाकून काही रक्कम आणि मोबाईल हस्तगत केले आहे.
सुरज शामराव दहिवाले वय २७ रा. इंदिरानगर, ता. पाथर्डी,संकेत सुधीर पवार. वय २७ रा. आखरभाग, पाथर्डी, दिपक भिमाजी सानप वय २५ रा.शिरसाठवाडी, ता. पाथर्डी या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे
आय.पी.एल. २०२२ मधील चालु असलेल्या दिल्ली कॅपीटल विरुद्ध गुजरात या क्रिकेटचे सामन्यावर बोली लावुन फोनवरुन क्रिकेटचा सट्टा हे इसम चालवित होते. क्रिकेटचा सट्टाच्या कारवाईत मोबाईल फोन,एल एडी टिव्ही व ईतर वस्तू असा एकूण १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस नाईक संदिप कानडे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अक्ट प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत सुरज दहिवाले याला यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सव्वा वर्षाकरता जिल्ह्यातून हद्दपार केल्याची कारवाईची नोटीस बजावली आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस नाईक ईश्वर गर्जे,अलत्तफ शेख, भगवान सानप, एकनाथ एकनाथ गर्कळ,कृष्णा बडे यांनी ही कारवाई.
पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात आयपीएल सट्टा वर लाखो रुपयांच्या उलाढाल होत असते यावरूनच नगर शहरात किती मोठी उलाढाल होत असेल याचा अंदाज आपण लावू शकतो नगर शहरातील डॉशी आणि पर्वताची सावली सध्या सर्वांना सांभाळून घेत असल्याने नगर शहरात कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू आहे