Home क्राईम मिरवणुकी दरम्यान भिंगार येथे दोन गटात राडा परस्पर विरोधी फिर्यादी दाखल

मिरवणुकी दरम्यान भिंगार येथे दोन गटात राडा परस्पर विरोधी फिर्यादी दाखल

अहमदनगर दि१५ एप्रिल

नगर शहरासह भिंगार येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकी दरम्यान दोन गटात झालेल्या धुमश्चक्री नंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिल्याने दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुसेन रहीमान खान (रा.मोमीनगल्ली ता.जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून सुनिल सोनवणे, शिवा भागानगरे, अशिष क्षेत्र, आकाश क्षेत्र अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे असून याच्यासह ४ से ५ अनओळखी (सर्व रा. भिंगार ता.नगर जि अहमदनगर) आदिंवर भादवि ३२४,१४३,१४७,१४८,१४९ कलमान्वेय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर दुसरी फिर्याद सुनिल भानुदास सोनवने यांनी दिली असून शादाब (पूर्ण नाव माहीत नाही रा.आलमगीर), मुक्कार नसीर शेख, फैसल हुसेन शेख, तौसिफ शेख (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. मोमीनगल्ली भिंगार), अरबाज कुरेशी ( रा.सदरबाजार भिंगार), खाज (मुन्ना भंगारवाला यांचा मुलगा), निसार कसाई राह (रा. कंजारवाडा भिंगार) या आरोपींवर पोलिसांनी भादवि कलम 143,147, 149, 323, 504, 506, सह अ.जा.ज.का.क.3(1) (r) (s) 3 (2) (va ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version