Home Uncategorized आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत झेंडे घेऊन टोळक्याची धार्मिक घोषणा देत हुल्लडबाजी; १२५...

आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत झेंडे घेऊन टोळक्याची धार्मिक घोषणा देत हुल्लडबाजी; १२५ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी

अहमदनगर दि.१५ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन करण्यात आलं ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र, अहमदनगरच्या संगमनेरमध्ये आंबेडकर जयंतीला गालबोट लागल्याचं समोर आल आहे. शहरातून निघालेल्या शोभायात्रेत शेकडो जणांच्या टोळक्यांनी शांततेत सुरू असलेल्या शोभायात्रेमध्ये धुडगूस  हुल्लडबाजी करत उत्साहात सुरू असलेल्या शोभायात्रेत तुफान घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते घटनास्थळी पोलीस दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात सर्व धर्मियांकडून अभिवादन केले जात असतानाच संगमनेरमध्ये मात्र धर्मांध तरूणांकडून विकृतीचे दर्शन पहायला मिळाले. दंगल घडवण्याच्या उद्देशाने कृत्य केल्याचे समोर येत आहे.

संगमनेर मधील मेन रोडवर असणाऱ्या कृष्ण मंदिरा समोर स्वागतासाठी उभ्या केलेल्या स्टेज जवळ मिरवणूक आली असता अचानक शंभर ते सव्वाशे तरुण चाँद तारा असलेले हिरवे आणि केशरी रंगाचे झेंडे हातात घेऊन मिरवणुकीत घुसले आणि धार्मिक घोषणाबाजी सुरू केली. काही तरुणांनी महिलांची छेड काढली.
या प्रकरणी आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा. मोमीनपुरा), अहमद कामर चौधरी, अमन समिन बागवान, हुजेब इबाल बागवान, सोहेल इबाल बागवान, अल्ला आजिज खान, हमजा शेख, साबीर शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजाण (गफ्फारचा मुलगा, पूर्ण नाव समजू शकले नाही), मारूफ अस्लम बागवान या प्रमुख आरोपींसह सुमारे शंभर ते सव्वाशे तरूणांवर धार्मिक भावना भडकावणे, दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करण्याच्या प्रयत्नाने धक्काबुक्की करणे, महिलांची छेडछाड करणे या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version