अहिल्यानगर दिनांक २८ एप्रिल : वीज वितरण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ठेकेदारांनी प्रलंबित बिलांचा प्रश्न आणि महावितरणचा मनमानी कारभार याविरोधात तीव्र भूमिका घेतली असून, प्रशासनाकडून तातडीने निर्णय न झाल्यास 1 मे 2026 पासून HT, LT व DTC संदर्भातील सर्व Preventive व Breakdown कामे बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक महिन्यांपासून केलेल्या कामांची बिल रक्कम प्रलंबित असून, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून कामकाज चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान, महावितरणकडून “ऑटो रॉबिन पद्धत” कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे (SOP), प्रशिक्षण किंवा पूर्वसूचना न देता लागू करण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये कामांचे वाटप, MO/PO प्रक्रिया, बिलिंग, पेमेंट सायकल, जबाबदाऱ्या व सुरक्षा नियम याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे ठेकेदारांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे.
सध्या तापमान रोजच वाढत असून त्यामुळे प्रत्येक घरात एसी कुलर फॅन चोवीस तास सुरू असूनही नागरिकांची लाहीलाही सुरूच आहे त्यामुळे जर एक मे पासून संप सुरू झाला तर कुठे लाईट बंद पडली तर ती सुरू करण्यासाठी पुरेसा कामगार वर्ग महावितरण कंपनीला ठेवणे गरजेचे आहे अन्यथा नागरिकांच्या रोशालाही महावितरणला सामोरे जावे लागणार आहे. कारण सध्याचा उन्हाळा फार तीव्र होत असून लाईट जाणे आणि ती लवकर आली नाही तर नागरिक आणि महावितरण मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यासारखे आहे.



