अहिल्यानगर
अहिल्यानगर मधील मुकुंद नगर परिसरात असणाऱ्या दर्गादायरा भागात महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार असलेल्या धिरज कचरुसिंग रजपुत (परदेशी) यास सहा ते सात जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे विशेष म्हणजे ही मारहाणा का झाली हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी अत्यंत क्रूरपणे जीवे मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
युनूस शेख याने ज्या ठिकाणी कामाचा कॉल आला नाही त्या ठिकाणी जाऊन लाईट दुरुस्तीचे काम करण्यास भाग पाडणे, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशा ठिकाणी धीरज याला मारहाण करणे मारहाण करणारे अचानकपणे येऊन सहा ते सात जण कोणतेही कारण नसताना धीरज याच्यावर राक्षसी प्रवृत्तीने तुटून पडणे, धीरज याला झालेली मारहाण पाहता त्याला जीवे मारून टाकण्यासाठीच मारहाण केल्याचं लक्षात येत असून मुकुंदनगरने आपली क्रूर प्रतिमा केली का? असंच या घटनेवरून लक्षात येते कारण धीरजला मारहाण होत असताना त्या ठिकाणी अनेक बघे उपस्थित होते तर मारहाण झाल्यानंतरही त्यास उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोणताही हात पुढे आला नाही यावरूनच हा क्रूरपना लक्षात येतोय.
ही घटना झाली यामागे काहीतरी मोठा प्लॅन आखूनच पद्धतशीरपणे धिरज कचरुसिंग रजपुत (परदेशी) यास मुकुंद नगर परिसरात बोलून घेऊन मारहाण केल्याचं लक्षात येत आहे. विशेष म्हणजे मारहाण झाल्यानंतर अथवा मारहाण करताना त्या ठिकाणी काही लोक उभे असताना कोणीही ही मारहाण सोडण्याचा प्रयत्नही केला नाही अथवा मारहाण झालेल्या राजपूत याला जखमी अवस्थेत दवाखान्यात नेण्यासाठी कोणीही मदत केल्याचं दिसून येत नाही यावरूनच या परिसरातील माणुसकी हरवली हे लक्षात येत असून पद्धतशीरपणे प्लॅन करून ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशा ठिकाणी नेऊन धिरज कचरुसिंग रजपुत (परदेशी) यास मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेत योगायोग म्हणावं किंवा प्लॅन म्हणावा असेच म्हणता येईल. या घटनेतील फिर्यादी अक्षय कैलास मुळे आणि धिरज कचरुसिंग रजपुत (परदेशी) दोघेही सोबत एका खाजगी कंपनीसाठी वायरमन चे काम करत होते. तर यांना आलेल्या लाईट दुरुस्तीच्या कॉल वरून पालीकेचा वायरमन युनुस शेख याने त्या दोघांनाही मुकुंद नगर येथील दर्गादायरा या ठिकाणी लाईट दुरुस्तीसाठी बोलून घेतले होते. ज्या ठिकाणी लाईट दुरुस्तीचे काम होते ते काम पूर्ण झाल्यानंतर युनुस शेख याने दर्गादायरा कब्रस्तान येथील दोन-तिन स्ट्रीट लाईट बंद आहेत ती दुरुस्त करून घेऊ असे म्हणून त्या दोघांनाही कब्रस्तान मध्ये घेऊन गेला काम सुरू असताना काही क्षणातच धिरज कचरुसिंग रजपुत (परदेशी) याला पाच ते सहा जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र अक्षय मुळे हा उंच ठिकाणी असल्याने त्याने त्याच ठिकाणावरून धीरज याला मारू नका म्हणून विनंती केली मात्र राक्षसी प्रवृत्तीचे मेहराज अस्लम सय्यद, सिराज असलम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद, युनुस शेख यांच्यासह दोन ते तीन जण धीरज यास बेदम मारहाण करत होते. विशेष म्हणजे ही मारहाणा होत असताना काही मंडळी त्या ठिकाणी आजूबाजूला उभी असतानाही भांडणे न सोडवता मारहाण पाहता गप्प उभे होते. मात्र राक्षसी प्रवृत्तीचे पाच ते सात जण लाकडी बल्ले, लोखंडी पाइपने मारहाण करत इसको मार डालो असे जोरजोराने ओरडून धीरज यास मारत असताना अक्षय याने वरूनच आपल्या हातात असलेली एक स्ट्रीट लाईट मारहाण करणाऱ्यांच्या दिशेने फेकून मारली. त्यावेळी त्या ठिकाणी तिसरा साथीदार काव्य तावरे हा देखील तिथे आल्यामुळे तो हि मोठमोठ्याने ओरडू लागल्यामुळे मारहाण करणारे राक्षसी प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणाहून आपल्या दुचाकीवरून पळून गेले.
अक्षय मुळे जेव्हा खाली आला तेव्हा धीरज हा बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. मात्र त्या ठिकाणी असलेले कोणताही माणूस यांच्या मदतीला आला नाही. त्यामुळे अक्षरशः लाईट दुरुस्तीसाठी आणलेल्या 407 या गाडीमध्ये धीरज याला टाकून अक्षय मुळे आणि त्याच्या साथीदाराने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. धीरज याच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणी आता भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी इतर आरोपी अद्याप फरार आहेत.
मुकुंद नगर आणि दर्गा दायरा हा बहुसंख्य मुस्लिम बांधवांचा भाग असून या ठिकाणी तुरळक इतर वस्ती आहे त्यामुळे कालची घटना ही अत्यंत भयानक अशी म्हणता येईल या घटनेमुळे मुकुंद नगरचे नाव बदनाम होण्यास वेळ लागणार नाही. जर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही लोकांनी धीरज यास मारहाण करताना सोडवण्याचा प्रयत्न केला असता किंवा मारहाण झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली असती तर निश्चितच वेगळा संदेश गेला असता मात्र अत्यंत मोठी घटना घडुनही मदतीचा हात पुढे आला नसल्याने एक वेगळा संदेश या घटनेतून जाण्यास वेळ लागणार नाही.





