अहिल्यानगर प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने अहिल्यानगर शहरातील युवा कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मा. ना. राधाकृष्णजी विखे पाटील व मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अनिल (अण्णा) मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रुद्रेश भाऊसाहेब अंबाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इंजि.श्री. रोहन भास्कर कुटे यांची भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर शहर जिल्हाउपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीपत्र प्रदान करताना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या संघटन कौशल्याचा, सामाजिक कार्याचा आणि राजकीय अनुभवाचा उल्लेख करत, भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांच्या कार्याचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांनी नवनियुक्त भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर शहर जिल्हाउपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
✍️ प्रतिक्रिया
“पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” अशी भावना नवनियुक्त भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर शहर जिल्हाउपाध्यक्ष इंजि.श्री. रोहन भास्कर कुटे यांनी व्यक्त केली.





