HomeUncategorizedवय विशीचे मात्र कारनामे टोकाचे... मी शाही न फुटलेल्या तरुणांकडून सापडला मोठा...

वय विशीचे मात्र कारनामे टोकाचे… मी शाही न फुटलेल्या तरुणांकडून सापडला मोठा शस्त्रसाठा शस्त्र बाळगणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

advertisement

अहमदनगर दि.२१ जून

अहमदनगर शहरातील भिंगार नाला परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका इसमास अटक करून त्याच्याकडून धारदार हत्यारे जप्त केली आहेत.


विशेष म्हणजे ताब्यात घेतलेली सर्व तरुण मुले असून वयाची वीस वर्ष पूर्ण झाले नसताना अत्यंत टोकाचे कारणामे या तरुणांकडून समोर आले आहेत तर एक अल्पवयीन मुलगाही यात सामील असल्याचं समोर आलंय.

साबीर सय्यद( रा. मुकुंदनगर, गोविंदपुरा,) हा हात्रे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला कळल्यानंतर त्या पथकाने साबीर सय्यद याच्या भोवती सापळा रचला त्यावेळी भिंगार नाला परिसरात साबीर सय्यद आपल्या साथीदारांसह आला असता पोलिसांनी अचानक छापा टाकुन चार इसमांना जागीच ताब्यात घेतले तर दोन इसम झाडा झुडपांचा फायदा घेवुन पळुन गेले.

साबीर अस्लम सय्यद , समी मुजीब शेख, अजहर गफ्फार शेख एक अल्पवयीन मुलगा यांच्या ताब्यातून १,५००/- रुपये किंमतीची एक तलवार, १,०००/- रुपये किंमतीची एक गुप्ती व ५,५००/- रुपये किंमतीचे दहा सुरे असा एकुण ८,०००/- हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

तर आयान समिर खान आणि सौरभ कथुरीया अशी भरारी तरुणांची नावे असून हे सर्व तरुण मुकुंद नगर भागात राहत होते.

याप्रकरणी भिमराज किसन खसे यांच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट क. ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहमदनगर व उपविभागीय पोलीस अधिकारी, अनिल कातकाडे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई/तुषार धाकराव, सफी/ भाऊसाहेब
काळे, पोहेकों/बापुसाहेब फोलाणे, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, मनोहर गोसावी, पोना/ रविंद्र कर्डीले,भिमराज खर्से, विजय ठोंबरे, संतोष लोढे, पोकॉ/मेघराज कोल्हे, अमृत आढाव व चापोहेकॉ/ उमाकांत गावडे आदींनी केली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular