Home Uncategorized अहमदनगरच्या पालकमंत्री पदी राधाकृष्ण विखे पाटील?

अहमदनगरच्या पालकमंत्री पदी राधाकृष्ण विखे पाटील?

मुंबई दि 24 सप्टेंबर
शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जूनला घेतली होती. त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिना उजाडला तरी पालकमंत्र्यांची नियुक्ती होत असल्याने अनेक ठिकाणी विकास कामे ठप्प झाले आहेत अशी ओरड होत होती तर विरोधी पक्षाकडून सातत्याने पालकमंत्री देण्यात यावे अशी मागणी होत होती.

९ ऑगस्टला मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रीच नियुक्त न झाल्याने अनेक अडचणी येत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकी नाहीत, पालकमंत्र्यांच्या अखत्यारित येणारे निर्णयही होवू शकलेले नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्रीच नसल्याने सरकार स्थिर नसल्याची मोठ्या प्रमाणात भावना होती.

आज पालकमंत्र्यांच्या नियुक्त झाले असल्याचे खतरनाक माहिती समोर येत असून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर शिक्का मुहूर्त झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिल्या सत्रातच महसूल मंत्री म्हणून वर्णी लागली होती राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, विजयकुमार गावित – नंदुरबार, चंद्रकांत पाटील – पुणे अशी काही नावे सूत्रांकडून मिळाली आहेत. त्यांच्याकडे आणखी काही अतिरिक्त जिल्हेही असतील

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version