अहमदनगर दि.२४ सप्टेंबर –
बनावट सोने तारण प्रकरणात दिवसेंदिवस कर्जाची रक्कम आणि बनावट सोने सापडणे वाढतच चालले आहे.शहरातील शहर सहकारी बॅंके नंतर आता श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या (Shree Sant Nagebaba Multistate Co Urban Credit Society)केडगाव शाखेत बनावट सोने तारण कर्ज प्रकरण केले असल्याचे उघड झाले असून या ठिकाणावरून तब्बल २३२१ ग्रँम बनावट सोने पोलिसांनी जप्त केले आहे तब्बल ७६ लाख रुपयांचा कर्ज घेतल्याचा प्रकरण समोर आले असून दरम्यान पोलिसांनी नागेबाबा पतसंस्थेचे आत्तापर्यंत एकूण ३६ खात्याची चौकशी केली असून ४ आरोपींना अटक केली आहे तर या पतसंस्थेतून आणखीन बनावट सोन्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मात्र चौकशी सुरू असताना बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे या सोसायटीमध्ये आणखी काही बनावट सोने ठेवून कर्ज प्रकरण झाल्याची शंका पोलिसांना असून त्याबाबत पोलीस तपास घेत आहेत मात्र बँकेने सहकार्य केले तरी प्रकरण समोर येऊ शकतात या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना.बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, करत आहेत.