Homeजिल्हानगर शहरासह राहुरी बसलेले धक्के भूकंपाचे नाहीत अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा...

नगर शहरासह राहुरी बसलेले धक्के भूकंपाचे नाहीत अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा प्रशासनाची माहिती

advertisement

अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 09.00 ते 09.30 वाजेच्या दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसलेबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सोशल मीडियावर हा धक्के भूकंपाचे आहेत का आणखी काही याबाबत तर कविता लावण्यात येत होते भूकंप झाला असल्याची माहिती अनेक सोशल मीडियावर देण्यात आली होती मात्र याबाबत नाशिक येथील मेरी येथील भूकंपमापन केंद्र अधिका-यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला होता तेथील भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याचे त्यांनी कळविले आहे.

तरी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवाहन
करण्यात आले असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. भूकंपाबाबत अफवा पसरवू नये वा अफवांवर विश्वास
ठेवू नये. घरांना हादरा बसल्यास नागरिकांनी सुरक्षितरित्या घराबाहेर पडावे. जुनाट, मोडकळीस आलेल्या वा दगड मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहणा-या नागरिकांनी विशेषतः दक्षता घ्यावी.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजी:
भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत
दक्षता घेणे.
* भूकंप का होतो त्याची कारणे व होणा-या परीणामांबाबत चर्चा करा.
* घराची नियमित पाहणी करुन दुरुस्ती करणे जरुरीचे आहे, भिंतींना तडे गेले असतील तर ते बुजविणे व
भिंतींची मजबुती करणे आवश्यक आहे.
: लोडबेअरींग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोप-यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह कॉक्रीट वापरणे व त्याची प्लींथ, लिंटल व रुफ बॅन्डमध्ये सांधणी करणे आवश्यक आहे.
* आपल्या घरातील कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक इमारतींमधील सुरक्षीत बाहेर पडण्याचे मार्ग जाणून व समजून घ्या.
: अवजड आणि मोठया वस्तू शक्यतो जमिनीलगत ठेवा, उंच जागेवर ठेऊ नका. घरातील कपाटे, अवजड फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थीत लावाव्यात.
भूकंपादरम्यान काय करावे :-
* स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा.
: जर तुम्ही घरात / इमारतीच्या आत असाल, टेबलाखाली अथवा पलंगाखाली बसून स्वतःचा बचाव करा. कॉलमजवळ, दरवाजाच्या चौकटीखाली उभे राहुन स्वतःचा बचाव करा. लिफ्टचा वापर करु नका.
दाराजवळ अथवा प्रवेशव्दाराजवळ गर्दी करु नका. भिंती, आरसे, फर्निचर, कंदील यांचेपासून लांब रहा.
शक्यतो चादर, उशी अथवा कपडयाची घडी डोक्यावर घ्या, जेणेकरुन इजा होणार नाही. जर तुम्ही रस्त्यावर असाल तर पटकन मोकळ्या जागेत जा, घाई गडबड करु नका. रस्त्याच्या कडेने जात असाल तर उंच जुन्या आणि सलग असणा-या इमारतीपासून लांब रहा. भिंती विजेच्या तारा
अंगावर पडण्याची शक्यता अशा वस्तूपासून दूर रहा.
* जर तुम्हा गाडी चालवत असाल तर जुन्या इमारती, भिंती, इलेक्ट्रीक वायर, केबल व उंचवटा यापासून
आपले वाहन दूर नेऊन थांबवा.

भूकंपानंतर काय करावे :-

शांत रहा, रेडीओ, टिव्हीव्दारे मिळणा-या सूचना काळजीपूर्वक ऐका व त्यांचे पालन करा.
• भूकंपानंतर अनेक अफवा उठतात उदा. जमिनीला भेगा पडल्या इ. खात्री शिवाय अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरवू नका.
: भूकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर छोटे धक्के बसू शकतात. त्यामुळे पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरु
असल्यास बंद ठेवा. काडी ओढू नका. विजेचे बटन लगेचच चालू करु नका, कारण गॅस गळती अथवा
शॉर्टसकट होण्याची शक्यता असते.
जर काही व्यक्ती जमिनीखाली दबल्या गेल्या असतील तर मदत तुकडीशी संपर्क साधावा.
दुषीत / उघडयावरचे पाणी पिणे टाळा, जेणेकरुन रोगांना प्रतिबंध होईल.
भूकंपाच्या धक्क्यामुळे ज्या घरांना / इमारतींना फार मोठे तडे गेले आहेत त्या इमारतींचा राहण्यासाठी
वापर करु नये.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular