Home राजकारण राजकीय परिवर्तनाची युवकांमध्ये ताकद, शहर व तालुक्यातील युवकांची काँग्रेसला प्रथम क्रमांकाची पसंती...

राजकीय परिवर्तनाची युवकांमध्ये ताकद, शहर व तालुक्यातील युवकांची काँग्रेसला प्रथम क्रमांकाची पसंती – किरण काळे , पै.दीपक जपकरांची युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काळेंच्या हस्ते सत्कार

.अहमदनगर : १२ ऑगस्ट

राजकीय, सामाजिक परिवर्तन होत असताना युवकांची भूमिका ही कलाटणी देणारी असते. नगर शहरासह तालुक्यामध्ये देखील युवकांची मोठी फळी काँग्रेस पक्षामध्ये दाखल होत आहे. अजूनही मोठ्या संख्येने युवक हे काँग्रेस पक्षामध्ये आगामी काळात प्रवेश करणार आहेत. नगर शहर व तालुक्यातील युवकांची काँग्रेस पक्षाला प्रथम क्रमांकाची पसंती असल्याचे प्रतिपादन, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी केले आहे.

नगर तालुक्यातील नेप्ती येथील पै.दीपक जपकर यांची युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट यांनी नियुक्तीपत्र देत जाहीर केले. नियुक्ती बद्दल काळेंच्या हस्ते जपकरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी काळे बोलत होते. पै.जपकर यांनी काही दिवसांपूर्वी काळे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील मीरपुर येथे झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आ. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता.

सावेडी उपनगरात पार पडलेल्या सत्कार कार्यक्रमासाठी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, निलेशदादा चक्रनारायण, उमेशराव साठे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शाहू होले, संकेत रोकडे, सौरभ भुजबळ, तेजस नेमाने, नितीन शिंदे, विजय करपे, अक्षय पाचारणे, सुरज शिंदे, महेश पाचरणे, संदीप भिंगारदिवे, आकाश पाचरणे, विनोद कदम, दत्ता अल्हाट, सागर साळवे, संदीप मेंगडे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पै.जपकर हे बापू या नावाने युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचा नेत्तीसह निमगाव वाघा, निमगाव घाणा, टाकळी, खातगाव, निंबळक, जखणगाव, हिंगणगावसह संपूर्ण तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. किरण काळे यावेळी म्हणाले की, नगर शहरासह नगर तालुक्यातील युवकांचे मजबूत संघटन माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली खाली उभे करण्याचे काम जोमाने सुरू आहे. युवक तालुकाध्यक्ष कुलट हे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापपाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात उत्तमरीत्या काम करीत आहेत.

सत्काराला उत्तर देताना पै.जपकर म्हणाले की, किरण काळे यांचे विचार आम्हाला पटल्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. माझ्यावर त्यांनी तालुका उपाध्यक्ष पदाची टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडत नगर तालुक्यात युवकांची मजबूत फळी उभी करण्याचे काम सर्व गावांमधील व पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटांमधील युवकांना बरोबर घेत मी करणार आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांवर युवक काँग्रेस आक्रमकपणे काम करत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी बोलताना जपकर म्हणाले.

निवडीबद्दल जपकर यांचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.लहू कानडे प्रदेश, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी डॉ.जयश्रीताई थोरात, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा बँकेचे माजी संचालक रावसाहेब शेळके, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण म्हस्के पाटील, जयंतराव वाघ, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, कार्याध्यक्ष राहुल उगले, जिल्हा युवक सरचिटणीस संदीप पुंड आदींनी अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version