अहमदनगर दि.६ डिसेंबर –
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अजित रोकडे यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला समवेत त्यांच्या मातोश्री शकुंतला रोकडे व पत्नी अशा रोकडे व बंधू सतीश रोकडे उपस्थित होते.यावेळी नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नागेबाबा उद्योगसमूहाचे अध्यक्ष कडू भाऊ काळे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, संभाजी पाटील, पुरुषोत्तम गड्डम आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अजित रोकडे यांनी अहमदनगर येथे संगणक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. सात/बारा संगणीकरण,सेतू हे प्रकल्प राज्यात पहिल्यांदाच अहमदनगर येथे राबवून संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरला त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्रास कमी झाला.शासकीय कार्यालयात येणाऱ्या पत्रव्यवहाराची संगणक प्रणाली तयार करून सर्वसामान्यांच्या पत्र अथवा तक्रारीचे वेळेत निपटारा करण्यासाठी मदत झाली सदर प्रणाली राज्यात सुमारे दीडशे शासकीय कार्यालयात वापरली जाते. रेशन वाटपाची बायोमेट्रिक प्रणाली पुणे जिल्ह्यात पथदर्शी स्वरूपात वापरून सुमारे 45 टक्के वाचवले व गरजूंना त्याचे रेशन मिळण्यात मदत झाली. समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या चळवळीत सक्रिय योगदान दिले आहे याचबरोबर वीस ते पंचवीस अपघातग्रस्तांना स्वतः मदत करून दवाखान्यात पोहोचवून जीव वाचविले टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक फलक लावून पारदर्शक कारभारासाठी शासनाच्या समितीचे सदस्य म्हणून काम करताना आर.एफ.आय.डी. प्रणाली टोल नाक्यावरची गर्दी कमी करण्यासाठीची शिफारस करून सर्वसामान्यांचा वेळ वाचविण्यासाठी चा प्रयत्न केला. याचबरोबर कोविड काळात गरजू कुटुंबांना व निराधार नागरिकांना अन्नधान्याची किट व निरोगी आरोग्यासाठी औषध वाटप करण्यात आले.आदींसह विविध सामाजिक उपक्रमामध्ये हिरारीने भाग घेत असतात या कामाची दखल घेत संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय शिवपूत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.