Homeशहरजुन्या महापालिकेत २० वर्षांनंतर ध्वजारोहण; महाराष्ट्र दिन- कामगार दिन उत्साहात उपमहापौर...

जुन्या महापालिकेत २० वर्षांनंतर ध्वजारोहण; महाराष्ट्र दिन- कामगार दिन उत्साहात उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण; स्व-जनगणनेचा शुभारंभ जनगणना ठरणार विकासाची दिशा – उपमहापौर धनंजय जाधव

advertisement

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक दोन तसेच जुन्या महापालिका परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे, जुन्या महापालिकेत तब्बल वीस वर्षांनंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
याच वेळी स्व-जनगणनेचा शुभारंभ उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपायुक्त शहनवाज तडवी, प्रभाग अधिकारी अजीम शेख, जनगणना अधिकारी राकेश कोतकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, नितीन इंगळे, सुबोध देशमुख, विकास गीते आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_0

यावेळी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, “जुन्या महापालिकेत वीस वर्षांनंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असल्याचा मला विशेष आनंद आहे. शहराच्या या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. कामगार हा देशाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या योगदानामुळेच देशाची प्रगती शक्य होते.
ते पुढे म्हणाले की, “१ मे ते १५ मे या कालावधीत स्व-जनगणना सुरू असून नागरिकांनी आपल्या मोबाईलवरील पोर्टलद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान घरोघरी जाऊन जनगणना करण्यात येणार आहे. ही जनगणना देशाच्या विकासाची दिशा आणि भविष्यातील वाटचाल निश्चित करणारी ठरणार आहे.

एकूणच, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली असून स्व-जनगणनेच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular