HomeUncategorizedआंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीवर असणार तिसऱ्या डोळ्याची नजर मिरवणूक मार्गावर सी...

आंबेडकर जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीवर असणार तिसऱ्या डोळ्याची नजर मिरवणूक मार्गावर सी सी टिव्ही सह ड्रोन कॅमेराची राहणार नजर

advertisement

अहमदनगर दि.१४ एप्रिल
अहमदनगर शहरात आज आंबेडकर जयंती निमित्ताने शहरातील अनेक भागात विविध मंडळाच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तर दुपारी चार वाजेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विविध सार्वजनिक मंडळांची मिरवणूक निघणार असून जवळपास 16 मंडळ या मिरवणूक सहभागी होणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या मिरवणूक मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून संपूर्ण मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत .तसेच आज निघणाऱ्या मिरवणुकीवर ड्रोन कॅमेरा द्वारे नजर ठेवण्यात येणार असून कोणत्याही अफवांना नागरिकांनी बळी न पडता कोणताही अनुचित प्रकार घडत असेल तर पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे.तसेच मिरूणूक मार्गवर अथवा परिसरात कुठे काही संशयित वस्तू किंवा इसम दिसल्यास कोतवाली पोलीस स्टेशन संपर्क साधावा असे आवाहन
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular