अहमदनगर दि. १३/०४/२०२४
14 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नीलक्रांती चौक मित्र मंडळाच्या वतीने भीम गीतांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथे आलेल्या सनी कांबळे ,विजय पठारे,यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी तुम्ही लहुजीचे गाणे लावा असे म्हणून दहशत निर्माण करुन राहुल अजय साळवे यास मारहाण करून चाकूने डोक्यात वार केले असल्याची घटना शुक्रवारी रात्री दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात घडले आहे याप्रकरणी
राहुल अजय साळवे याच्या फिर्यादी वरून तोफखाना पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०७,१४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६,४२७ सह क्रिमीनल अमॅनमेंट १९३२ चे कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे सनी कांबळे,विजय पठारे, यांच्यासह दहा ते बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ठिकाणी झालेल्या दोन गटांच्या हाणामारीत चाकु, शॉकबसरचे पाईप, लोखंडी पाईप याचा सर्रास वापर करण्यात आला होता त्यामुळे या हाणामारी मध्ये राहुल अजय साळवे, एकनाथ गायकवाड,प्रतिक शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ गावडे हॉस्पीटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत.