HomeUncategorizedमतदार फक्त मतदानाच्या दिवशीच "राजा" असतो.. नंतर त्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच...

मतदार फक्त मतदानाच्या दिवशीच “राजा” असतो.. नंतर त्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसतो… लालटाकी ते सर्जेपुरा खड्ड्यांच्या रस्त्याबाबत सुस्त पडलेल्या मनपा प्रशासनाला जाग कधी येणार ?

advertisement

अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर
अहमदनगर महानगरपालिकेचा स्वस्त कारभार आणि सोशिक नगरकर यामुळे नगर शहरातील रस्ते वर्षानुवर्षे खड्ड्यातच राहत आहेत याच खड्ड्यातून कशी तरी वाट काढत नागरिक प्रवास करत असतात मात्र या कोणीच आवाज उठवत नाही हे विशेष.

अहमदनगर शहरातील लाल टाकी ते सर्जेपुरा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयानीय झाली आहे. रस्ता फक्त नावापुरता शिल्लक राहिला असून जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे उरलेल्या रस्त्यातून कशीबशी वाट काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय.

हा रस्ता ज्या नगरसेवकांच्या प्रभागात येतो त्या नगरसेवकांनाही याबद्दल काही वाटत नसेल का? का निवडून येण्यापुरतच मतदार हा राजा असतो त्यानंतर त्याच्या प्रश्नांबद्दल कुणीही आवाज उठवायचा नाही असा काही राजकीय नियम आहे का? कारण अनेक वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.मात्र याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नाही तर महानगरपालिका प्रशासन सुस्त अजगरासारखे पडून आहे.
महानगरपालिकेची झोप कधी उघडणार आणि महानगरपालिका प्रशासन जनतेच्या सोयी सुविधांकडे लक्ष कधी देणार असा भोळाभाबडा प्रश्न अहमदनगरच्या नागरिकांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी सातव्या वेतन आयोगासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिका बंद ठेवली होती तो त्यांचा हक्क असेल मग जनतेचा हक्कासाठी गोलगट्ट पगार घेऊन जनतेचे काम का होत नाही हा एक प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेतील बांधकाम विभाग नेमकं काय करतोय या ठिकाणचे अधिकारी काय काम करतात किती दिवस खुर्ची उबवण्याचे काम महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात होत राहणार जनता एवढे हाल सहन करत असताना मात्र अधिकारी एसी कॅबिनमध्ये बसून फक्त टेंडर पास करता येतका? मग काम कधी सुरू होणार हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

लाल टाकी ते सर्जेपुरा याच प्रमाणे नगर शहरातील आणि उपनगरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सध्या हिवाळा सुरू असून हिवाळ्यात काम झाल्याने रस्ते टिकू शकतात मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर अहमदनगर शहरात रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरू होतात आणि हे रस्ते सहा महिने सुधा टिकत नाही असे अनेक उदाहरणं नगर शहरात आहेत. मात्र नगरकरांच्या हक्काचा पैसा असा पाण्यात वाया घालवण्याचा हक्क या अधिकाऱ्यांना कोणी दिलाय. थोडी तरी लाज असेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लालटाकी ते सर्जेपुरा रस्ता आणि यासारखे असंख्य रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत आणि जनतेला सुखाचा प्रवास करून द्यावा अशीच छोटीशी मागणी नगरकर करत आहेत. मात्र अजगरासारख्या सुस्त महानगरपालिका प्रशासनाला हे कधी कळणार!

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular